I.N.D.I.A Alliance Meeting Mumbai Saamtv
मुंबई/पुणे

INDIA Mumbai Meet: लोगो अनावरण पुढे ढकललं, संयोजक पदाचा वाद मिटेना.. 'INDIA' च्या दुसऱ्या दिवशीच्या बैठकीत काय काय घडलं?

I.N.D.I.A Alliance Meeting Mumbai: इंडिया आघाडीच्या लोगोवर एकमत न झाल्याने हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे.

Gangappa Pujari

Opposition Meeting In Mumbai: मुंबईमध्ये सध्या इंडिया आघाडीच्या बैठकीने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या बैठकीचा दुसरा दिवस असून लोगो अनावरण होणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र एकमत न झाल्याने ऐनवेळी लोगो अनावरनाचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. तसेच इंडिया आघाडीच्या संयोजक पदावरुनही वाद उभा राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बैठकीचा दुसरा दिवस...

याबाबत सविस्तर माहिती अशी की, देशातील विरोधी पक्षांच्या 'इंडिया' (India Aaghadi) आघाडीची बैठक मुंबईतील ग्रँड हयात (Hotel Grand Hayat) या हॉटेलमध्ये सुरू आहे. आज या बैठकीचा दुसरा दिवस आहे. आज आघाडीच्या बैठकीत लोगो अनावर होणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र ऐनवेळी एकमत न झाल्याने हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे.

लोगो, संयोजकपदावरुन एकमत नाहीच...

सर्वच पक्षांकडे पक्षचिन्हे असल्याने 'इंडिया आघाडीसाठी' वेगळा लोगो कशाला.. अशी भूमिका काही पक्षांनी घेतल्याने संभ्रम निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच आघाडीच्या संयोजक पदावरुनही वाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikaarjun Kharge) यांच्या नावासाठी कॉंग्रेस आग्रही आहे. मात्र इतर पक्षांनी कॉंग्रेसने मनाचा मोठेपणा दाखवून संयोजक पद घेवू नये अशी भूमिका घेतली आहे.

नेत्यांचे फोटोसेशन....

दरम्यान, आजच्या बैठकीत इंडिया आघाडीच्या नेत्यांनी खास फोटोसेशन केले. नेत्यांच्या फोटोसेशनमध्ये पहिल्या रांगेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut), लालुप्रसाद यादव, मेहबुबा मुफ्ती, अरविंद केजरीवाल, राहुल गांधी (Rahul Gandhi) नितीश कुमार, ममता बॅनर्जी, सोनिया गांधी, उद्धव ठाकरे, शरद पवार (Sharad Pawar), मल्लिकार्जुन खर्गे, एम. के. स्टॅलिन, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, फारूक अब्दुल्ला या नेत्यांचा सामावेश आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची तब्येत खालवली; तातडीनं रुग्णालयात दाखल

विधानपरिषद निवडणुकीत शिंदेसेना-भाजप आमनेसामने; महायुतीतला वाद चव्हाट्यावर

रामलीला मैदानावर रावणासोबत झुरळही जाळणार; स्वच्छ भारत अभियानाचा दावा की राजकीय निशाणा?

CJPच्या आंदोलनाआधीच दिपके पोलिसांच्या ताब्यात; दिल्लीत पुन्हा एकदा हायव्होल्टेज ड्रामा

तिकीट तपासणीवरून महिला प्रवासीचा टीसीसोबत वाद; कांदिवली स्टेशनवर नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT