pune Crime Saam TV
मुंबई/पुणे

पुणे हादरले! लष्कर परिसरातील फॅशन स्ट्रीट भागात नागरिकावर गोळीबार

जखमीला रुग्णालयात दाखल केले आहे.

साम टिव्ही ब्युरो

पुणे : पुण्यातील (Pune) लष्कर परिसरात एका नाागरिकावर गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना लष्कर परिसरातील फॅशन स्ट्रीट परिसरात ही घटना घडली. या गोळीबारात एकजण जखमी झाला आहे. जखमीला रुग्णालयात दाखल केले आहे. एका विरोधात पोलिसात (Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, लष्कर भागातील गजबजलेल्या फॅशन स्ट्रीट परिसरात एकावर छऱ्याच्या बंदुकीतून गोळीबार करण्यात आली. ही घटना मंगळवारी रात्री घडली. ही घटना पूर्ववैमनस्यातून घडली असल्याची शक्यता आहे.

तौफिक अख्तर शेख (वय ४५) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी जुल्फीफार शेख नावाच्या व्यक्ती विरुद्ध रात्री उशिरा लष्कर पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तौफिक शेख व जुल्फीकार शेख यांचे फॅशन स्ट्रीट परिसरात व्यवसाय आहेत.

या दोघात काही दिवसापासून वाद सुरू आहे. या वादातूनच काल गोळीबार झाला . मंगळवारी रात्री तौफिक फॅशन स्ट्रीट परिसरातील एका दुकानाजवळ थांबले होते. त्यावेळी जुल्फीकार तेथे आला आणि त्याने त्याच्याकडील छऱ्याच्या बंदुकीतून तोफिकवर गोळीबार केला. या गोळीबाराने परिसरात गोंधळ झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस दाखल झाले. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check : SIR चा फॉर्म भरल्यावर मिळणार १६ हजार रुपये? व्हायरल पोस्टमागचं सत्य काय?

Coriander Storage: फ्रिजमध्ये कोथिंबीर लगेच काळी पडते? मग या ट्रिक्स वापरा 10 दिवस फ्रेश राहील

Maharashtra News Live Update: चंद्रपूर- मनपा आमसभेच्या कोरमवरून महापौर नगरसेवकांमध्ये आरोप प्रत्यारोप

श्रावण कधीपासून सुरु होणार? जाणून घ्या तारीख आणि धार्मिक महत्त्व

Health Care : सतत थकल्यासारखे वाटते का? ' ही' ५ गंभीर लक्षणे फॅटी लिव्हरची असू शकतात, वेळीच ओळखा

SCROLL FOR NEXT