Pune Metro Saam TV
मुंबई/पुणे

One Pune Metro Card Launched : 30 टक्के सवलत, जाणून घ्या महामेट्रोची 'एक पुणे विद्यार्थी पास' कार्ड याेजना

'एक पुणे विद्यार्थी पास' कार्ड घेण्यासाठी किमान १३ वर्षे वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

गोपाल मोटघरे

Pune Mahametro News : पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील विद्यार्थ्यांना पुणे मेट्रोतून दैनिक प्रवास सुखकर व माफक दरात करता यावा याउद्देशाने आजपासून (ता. 6 ऑक्टोबर) 'एक पुणे विद्यार्थी पास' सेवेचा महामेट्रोकडून प्रारंभ करण्यात आला. विद्यार्थ्यांसाठी 'एक पुणे विद्यार्थी पास' सर्व मेट्रो स्थानकावर उपलब्ध असल्याची माहिती महामेट्रोकडून देण्यात आली आहे. (Maharashtra News)

महामेट्रोकडून विद्यार्थ्यांसाठी 'एक पुणे विद्यार्थी पास' या अंतर्गत पहिल्या १० हजार विद्यार्थ्यांना हे कार्ड मोफत दिले जात आहे. या कार्डधारकांना तिकिटात ३० टक्के सवलत मिळणार आहे.

'एक पुणे विद्यार्थी पास' कार्ड घेण्यासाठी किमान १३ वर्षे वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. १३ ते १८ वर्षे वय असणारे विद्यार्थी पॅन कार्ड नसल्यास एक ई-फॉर्म भरून आपले हे कार्ड घेऊ शकतात. हे कार्ड घेण्यासाठी महाविद्यालयाचे ओळखपत्र किंवा चालू शैक्षणिक वर्षाचे बोनाफाईड प्रमाणपत्र आवश्यक असेल.

हे कार्ड घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला तिकीटामध्ये ३० टक्के सवलत लागू असेल. या कार्डची वैधता ३ वर्षे असून, ते अहस्तांतरणीय आहे असेही महामेट्राकडून (pune metro) सांगण्यात आले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Idli- Dosa For Diabetes: डायबिटीजचे रूग्ण इडली, डोसा खाऊ शकतात का? जाणून घ्या ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहण्यासाठी काय खावे?

Gold Price Today: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! अचानक भाव घसरला; किती रुपयांनी झालं स्वस्त?

Maharashtra News Live Update: जळगावात पुन्हा भीषण अपघात टँकरच्या धडकेत आयटीआय विद्यार्थ्याचा मृत्यू; दोन जखमी

पुण्यात अवघ्या १३ लाखांत हक्काचं घर, म्हाडाचा ४४६२ फ्लॅटचा धमाका, लोकेशनची नावं समोर, वाचा A टू Z माहिती

Bank Holiday List: उद्या बँकेत काम असेल तर थांबा! महाराष्ट्रासह अनेक राज्यांत बँका बंद

SCROLL FOR NEXT