Accident, Kharghar, Belapur, Sion Panvel Highway, Kamothe.  Saam tv
मुंबई/पुणे

Accident : कामोठे उड्डाणपुलावर पाच वाहनं एकमेंकावर आदळली; एक ठार, सहा जखमी

सायन पनवेल महामार्गावर आज दाेन ठिकाणी झाले अपघात.

साम न्यूज नेटवर्क

- सिद्धेश म्हात्रे

नवी मुंबई (navi mumbai latest marathi news) : सायन- पनवेल महामार्गावर (sion panvel highway) कामोठे उड्डाणपुलावर आज (रविवार) सकाळी भीषण अपघात (accident) झाला. पाच वाहनांच्या झालेल्या या आपघातात एकाचा मृत्यू झाल्याची माहिती पाेलीसांनी दिली. या अपघातात पाच ते सहा जण जखमी (injured) झाले आहेत असेही पाेलीसांनी (police) सांगितले. (sion panvel highway accident marathi news)

सायन- पनवेल महामार्गावरील कामोठे उड्डाणपुलावर (kamothe bridge) बंद पडलेल्या ट्रकचे दुरुस्तीचे काम चालू होते. यावेळी पाठीमागून भरधाव येणाऱ्या वाहनाची ट्रकला धडक बसली. प्राथमिक माहितीनूसार चालकाला अंदाज न आल्याने त्याच्या वाहनाची ट्रकला धडक बसली. या धडकीत वाहनाचा (vehicle) चक्काचूर झाला. या घटनेत एकाचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले आहेत.

दरम्यान या अपघातानंतर या मार्गावरुन धावणारी इतर तीन वाहनं अपघातग्रस्त वाहनांवर जाऊन आदळली. यामुळे तिघे जखमी झाले. या जखमींना तातडीने नजीकच्या एमजीएम रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान सायन पनवेल महामार्गावर खारघर (kharghar Accident) जवळ आणखी एक अपघात घडला. खारघर उड्डाणपुलावर (kharghar Bridge) दाेन ट्रेलर आणि एका चार चाकीचा अपघात झाला. या अपघातानंतर सायन पनवेल महामार्गावर वाहतूकीची कोंडी निर्माण झाली हाेती. ही वाहतूक कोंडी बेलापूर (belapur) पर्यंत झाली हाेती. या अपघातात वाहनांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. वाहतूक पोलिस वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी प्रयत्न करताहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राज्यात उष्णतेचा कहर, विदर्भात तापमान ४५ पेक्षा जास्त

IPL 2026 मधील सर्वात जबरदस्त सामना; अवघ्या ३९ चेंडूंत RCBने मिळवला विजय,पॉईंट्स टेबल बेंगरुळुची भरारी

Vande Bharat Train Accident : मुंबईहून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा अपघात कसा घडला? कारण आलं समोर

Gold and Silver Prices: चांदी चकाकली! चांदीच्या दरात ३,५०० रुपयांची वाढ, सोनंही महागलं

LPG Cylinder Booking Rules: १ मे पासून एलपीजी बुकिंगचे नियम बदलणार, सिलिंडर डिलीव्हरीतही बदल होणार?

SCROLL FOR NEXT