mumbai ahmedabad national highway accident news, palghar saam tv
मुंबई/पुणे

Mumbai- Ahmedabad National Highway : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर कारचा भीषण अपघात, पती मृत्यूमुखी; पत्नीसह मुले सुखरुप

महामार्ग वाहतूक पोलीसांनी अपघातग्रस्त कार बाजूला करून वाहतूक पूर्ववत सुरु केली.

रुपेश पाटील

Palghar News : मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आज (शुक्रवार) पहाटेच्या सुमारास झालेल्या कारच्या अपघातात (mumbai ahmedabad national highway accident news) एकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेत कारमधील अन्य तिघे जण सुखरुप असल्याची माहिती पाेलिसांनी दिली. (Maharashtra News)

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार आज पहाटेच्या सुमारास मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर तवा आश्रमशाळा व राजधानी हॉटेल परिसरात हा अपघात झाला. अपघातग्रस्त कार गुजरातच्या दिशेने निघाली हाेती.

या महामार्गावर उभ्या असलेल्या कंटेनरला कारने मागून जोरदार धडक दिल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. या घटनेत कार चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. या कारमधील तिघे जण सुखरुप असल्याची माहिती पाेलिसांनी दिली. यामध्ये कार चालकाची पत्नी व दोन मुलांचा समावेश आहे.

कार चालकाचा मृतदेह कासा ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. महामार्ग वाहतूक पोलीसांनी अपघातग्रस्त कार बाजूला करून वाहतूक पूर्ववत सुरु केली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीचा घटस्फोट, ४ वर्षांचा सुखी संसार तुटला; सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितलं कारण...

Maharashtra News Live Update: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी श्री स्वामी समर्थ महाराजांचे घेतले दर्शन

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना खुशखबर! बँक खात्यात १५०० रुपये जमा होण्यास सुरुवात; तुमच्या खात्यात आले का पैसे? लगेच करा चेक

Mumbai Tourism : मुंबईत राहूनही तुम्ही कधीच पाहिले नसाल 'हे' ५ सीक्रेट पिकनिक स्पॉट्स, उन्हाळी सुट्टी करा एन्जॉय

Government Job Rule : सरकारी नोकरभरती प्रक्रियेत मोठा बदल, सरकारनं नेमका काय निर्णय घेतला? जाणून घ्या!

SCROLL FOR NEXT