BREAKING : धारावीत सापडला ओमिक्रोनचा नवा रुग्ण, पाहा व्हिडिओ saam media
मुंबई/पुणे

BREAKING : धारावीत सापडला ओमिक्रोनचा नवा रुग्ण, पाहा व्हिडिओ

टांझानियावरून आलेला प्रवासी ओमायक्रॉन पॉझिटिव्ह

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : कोरोनाच्या नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉन मुंबईमध्ये (Omicron Variant) आता चांगलच हातपाय पसरत आहे. मुंबई ही सर्वात गजबजलेली झोपडपट्टी असलेल्या धारावीत (Dharavi) अखेर ओमायक्रॉनने (Omicron) चा शिरकाव झाला आहे. परदेशामधून आलेल्या एका मौलवीचा रिपोर्ट हा ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आला आहे. (omicron variant tested patient found in mumbai dharavi)

पहा व्हिडिओ-

डोंबिवली मधील आढळलेला ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण निगेटिव्ह आढळल्याने सर्वांना दिलासा मिळाला होता. पण आता परदेशातून मुंबईतील धारावीमध्ये आलेल्या एका नागरिकाचा कोविड रिपॉर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यानंतर या रुग्णाचा स्वॅब जिनोम सिक्वेन्सिंगकरिता पाठवण्यात आले होते. त्याचा अहवाल आता समोर आला असून ओमायक्रॉनची लागण झाल्याचे यामध्ये निष्पन्न झाले आहे.

पूर्व अफ्रिकेमधील टांझानिया येथून आलेली व्यक्ती ही मौलवी आहे. मुंबई आल्यानंतर ते धारावी येथील एका मशिदीमध्ये वास्तव्यास होते. सुरुवातील या व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर या रुग्णाला उपचाराकरिता मुंबईमधील सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्याचा स्वॅब जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आला होता.

तो अहवाल आता पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे ज्या गोष्टीची भिती होती तेच झाले आहे. धारावीमध्ये ओमायक्रॉनने शिरकाव केला आहे. या मौलवीच्या संपर्कामध्ये आलेल्या व्यक्तींचा शोध घेतला जात आहे. या मौलावीला तातडीने क्वारंटाइन करण्यात आले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

Makeup Side Effects: दररोज मेकअप केल्याने चेहऱ्यावर काय परिणाम होतो?

Maharashtra Politics : अजित पवार मला टॉर्चर करतात, शिंदेंचा गंभीर आरोप

Maharashtra Politics : रोहित पवारांची वृत्ती औरंगाजेबासारखी, मला अजित पवारांच्या मुलांची चिंता; गोपीचंद पडळकर असे का म्हणाले?

SCROLL FOR NEXT