Omicron: जानेवारी फेब्रुवारीत काळजी घ्यावी लागणार; अजित पवारांचे आवाहन Saam TV
मुंबई/पुणे

Omicron News: जानेवारी फेब्रुवारीत काळजी घ्यावी लागणार; अजित पवारांचे आवाहन

सध्या कोरोनाचे (Corona) सावट वाढले आहे, सुप्रिया सुळे यांचे संपूर्ण कुटुंब कोरोना पॉझिटिव्ह आले आहे.

अश्विनी जाधव - केदारी

पुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणूक प्रचारासाठी आयोजित सभेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रचार सभेला उपस्थिती होती. त्यामुळे कार्यकर्तांनी प्रचंड गर्दी केलेली पाहायला मिळाली. अण्णाभाऊ साठे सभागृहात प्रचार सभा आयोजीत केली होती. स्टेजवरसुद्धा कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती तर अनेकांनी मास्कही लावलेले नव्हते. गर्दी आणि मास्क वरुन सतत बोलणाऱ्याला अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत होत असलेल्या सभेतच कार्यकर्त्यांनी कोरोना नियमांना हरताळ फासल्याचं पाहायला मिळालं.

सध्या कोरोनाचे (Corona) सावट वाढले आहे, सुप्रिया सुळे यांचे संपूर्ण कुटुंब कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. लोकांना गांभीर्य राहिलेले नाही, अधिवेशनात मला म्हणाले की मी सभागृहात आल्यापासून ते जाई पर्यंत मास्क लावलेला असतो, बोलताना काढत नाही. आपल्याला नियम पाळावेच लागणार आहे, आपणच नियम पाळत नसू तर लोकांना सांगायचा अधिकार आपल्याला अधिकार नाही. जानेवारी आणि फेब्रुवारी मध्ये आपल्याला काळजी घ्यावी असल्याचे अजित पवारांनी सभेदरम्यान सांगितले आहे. आम्हाला ही निर्बंध लावायला चांगलं वाटत नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी होऊ नये यासाठी कार्यकर्त्यांनी भावनेला मुरड घालावी असे आवाहन पालकमंत्री अजित पवारांनी केले आहे.

बरेच जण भेटतात, पत्र पाठवतता तुमच्यासाठी हॉटेलचं उद्घाटन, कार्यालयाच उदघाटन थांबलं आहे, पण मी आलो तर गर्दी होणार, आजकाल सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया किती ऍक्टिव्ह झाले आहेत. मग फोटो येणार, गुन्हे दाखल करायला लागणार, मग परत विचारणार आमच्यावर कोण गुन्हे दाखल करणार असे म्हणत नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करावे असे आवाहन केले आहे. त्याचबरोबर पुणे जिल्हा बँकेचा कारभार सुरळीत सुरू आहे. माझी राजकीय सुरवात पीडीसीसी बँकेतुन झाली आहे. काही बँका मात्र, पार रसातळाला गेल्या असल्याचे अजित पवार म्हणाले.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: फटाके वाजवायला गेला, पोरांनी घाबरवले, तोंडावरच आपटला, व्हिडीओ पाहून तुम्हीही हसाल

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात, एकाच कुटुंबातील ३ जणांचा मृत्यू

Navi Mumbai Accident : दिवाळीत 'ड्रंक अँड ड्राइव्ह, नवी मुंबईत मद्यपी चालकाने ३ जणांना उडवले, व्हिडीओ व्हायरल

Horoscope Today Marathi : नोव्हेंबरच्या पहिल्या दिवशी कुणावर होणार धन अन् सुखाचा वर्षाव? वाचा आजचे राशीभविष्य

Surya nakshatra gochar: सूर्याच्या नक्षत्र बदलाने 'या' राशींचं नशीब चमकणार; 'या' राशींच्या हाती येणार बक्कळ पैसा

SCROLL FOR NEXT