Pune Crime News Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Crime News : संतापजनक! पुण्यात ओला कॅबचालकाचे प्रवासी महिलेशी अश्लील चाळे; गुन्हा दाखल

या प्रकरणी कॅब चालकाविरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Shivani Tichkule

सचिन जाधव

Pune News : राज्यात गेल्या काही दिवसांत गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. अनैतिक संबंध, कौटुंबिक कलह, आर्थिक फसवणूक यातून हत्या आणि आत्महत्येच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. त्यातच आता पुणे येथून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

पुण्यात (Pune) एक संतापजनक घटना घडली आहे. ओला कॅबचालकाने प्रवासी महिलेची छेड काढून अश्लील चाळे केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या प्रकरणी कॅब चालकाविरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत एका महिलेने हडपसर पोलीस (Police) ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी ओला कॅब चालक श्रीराम मधुकर घारबुडे (वय ३२) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार महिला मगरपट्टा सिटी परिसरातून सेनापती बापट रस्त्यावरील खासगी कंपनीच्या कार्यालयात निघाली होती.

प्रवासात कॅब चालक घारबुडे याने मोटारीच्या आरशाची दिशा बदलली. त्याने प्रवासी महिलेकडे एकटक पाहण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने मोटारीत अश्लील वर्तन केले. महिलेने याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली. याबाबत हडपसर पोलीस तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope: प्रेमातले वाद मिटतील, कामात होणार प्रगती; ५ राशींचं नशीब फळफळणार

Pune Crime: पुणे हादरले! दिराकडून भावजयीवर जीवघेणा हल्ला, कोयत्याने सपासप वार

Pre Primary School: नोंदणी अनिवार्य ! पूर्व प्राथमिक शाळांसाठी सरकार आणणार नवा कायदा

केरळमध्ये कमळ फुलवण्यासाठी भाजप लागली कामाला ;महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यावर सोपवली मोठी जबाबदारी

Beed Crime: जमीन-ट्रॅक्टरसाठी नातं विसरला; जन्मदात्यासह बहीण आणि मेहुण्याला लोखंडी पाईपनं बेदम मारहाण

SCROLL FOR NEXT