OBC LEADER MANGESH SASANE RECEIVES DEATH THREAT AMID PUNE CASTE CERTIFICATE CONTROVERSY Saam Tv
मुंबई/पुणे

Mangesh Sasane : 'आमचं नगरसेवक पद घालवतो का? थांब गोळ्याच घालतो'; ओबीसींच्या बड्या नेत्याला जीवे मारण्याची धमकी, राजकीय वर्तुळात खळबळ

Adv Mangesh Sasane Pune News : पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील जात प्रमाणपत्र वादाच्या पार्श्वभूमीवर ओबीसी नेते मंगेश ससाणेंना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.

Alisha Khedekar

  • ओबीसी नेते मंगेश ससाणेंना जीवे मारण्याची धमकी

  • ‘कुणबी’ बनावट प्रमाणपत्राचा गंभीर आरोप

  • २० नगरसेवकांच्या जात पडताळणीची प्रक्रिया सुरू

  • पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू

राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. ओबीसी नेते मंगेश ससाणे यांना गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत उमेदवारांनी कुणबी’ या ओबीसी प्रवर्गाचा खोटा दावा केल्याचा गंभीर आरोप मंगेश ससाणे आणि मृणाल ढोले-पाटील यांनी केला. यानंतर आता मंगेश ससाणे यांना केस मागे घेण्यासाठी अज्ञात व्यक्तीने फोन करून गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीनंतर पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील काही नगरसेवकांच्या जात प्रमाणपत्रांवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. ओबीसी आरक्षित जागांवर निवडून आलेल्या काही उमेदवारांनी ‘कुणबी’ या ओबीसी प्रवर्गाचा खोटा दावा केल्याचा गंभीर आरोप ओबीसी कार्यकर्ते मंगेश ससाणे आणि मृणाल ढोले-पाटील यांनी केला. ओबीसी कार्यकर्ते मंगेश ससाणे आणि मृणाल ढोले-पाटील यांनी या संदर्भात जिल्हा जात पडताळणी समिती, पुणे येथे अधिकृत तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, मराठा समाजातील काही उमेदवारांनी कुणबी असल्याचे बनावट प्रमाणपत्र सादर करून निवडणूक लढवली आणि विजय मिळवला. या तक्रारीच्या आधारे पिंपरी-चिंचवडचे माजी महापौर रवी लांडगे यांच्यासह सुमारे २० नगरसेवकांच्या जात प्रमाणपत्रांची पडताळणी प्रक्रिया सध्या सुरू आहे.

नियमांनुसार, आरक्षित जागेवर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना सहा महिन्यांच्या आत वैध जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असते. तसे न केल्यास त्यांचे पद रद्द होऊ शकते. त्यामुळे संबंधित नगरसेवकांचे पद धोक्यात आले असून, त्यांच्या राजकीय भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. तक्रारदार मंगेश ससाणे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

ससाणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना रात्री सुमारे २ वाजता अज्ञात व्यक्तीकडून फोन आला. “आमचं नगरसेवक पद घालवतो का? केस मागे घे, नाहीतर गोळ्या घालतो,” अशी धमकी देण्यात आली. तसेच “मागच्या वेळेस तू वाचला आहेस, आता सोडणार नाही,” असेही त्या व्यक्तीने म्हटल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर ससाणे यांनी तत्काळ पोलिसांत तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आनंदाची बातमी! सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; PM मोदींच्या आवाहनानंतर ग्राहकांनी शोधला अनोखा जुगाड

Bone Cancer: ही ५ लक्षणं दिसली तर समजा हाडांचा कॅन्सर शरीरात करतोय घर

Aadhaar Card Update: कामाची बातमी! हे Aadhaar App कायमचं होणार बंद; UIDAI दिली मोठी अपडेट

Maharashtra News Live Update: मान्सून अंदमानात दाखल; लवकरच महाराष्ट्रात येणार

Face Care: ओपन पोर्स आणि टॅनिंग लवकर कमी करायचंय; मग हा घरगुती टोनर स्प्रे नक्की लावा

SCROLL FOR NEXT