Rajesh Tope Saam Tv
मुंबई/पुणे

कोणत्याही निर्बंधांशिवाय आषाढी वारी होणार; राजेश टोपेंनी दिली माहिती

आज मंत्री मंडळाची बैठक झाली. या बैठकीत कोरोनाच्या वाढत्या रुग्णांसंदर्भात महत्वपूर्ण चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: गेल्या काही दिवसापासून राज्यात कोरोनाचे (Corona) रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे राज्य सरकारने आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. तज्ज्ञांनी दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुंबई, पुण्यासह राज्यातील इतर सहा जिल्ह्यात कोरोना रुग्णात लक्षणीय वाढ झाली आहे. आज मंत्रीमंडळाची बैठक झाली. या बैठकीत कोरोनाच्या वाढत्या रुग्णांसंदर्भात महत्वपूर्ण चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. काही दिवसावर आषाढी वारी आहे, या संदर्भातही चर्चा झाल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.

'मंत्री मंडळाच्या बैठकीत दिंडीच्या बाबतीत चर्चा झाली. दिंडीत १० ते १५ लाख लोक एकत्र जमणार आहेत. त्यामुळे सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. यावर्षी वारी होणार आहे, पण सर्वांनी काळजी घेण्याची गरज असल्याचे, टोपे म्हणाले. यावर्षी होणाऱ्या आषाढी वारीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. त्यामुळे आता वारीवर कोणतेही निर्बंध घालता येणार नाहीत, असंही आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) म्हणाले.

महाराष्ट्रात काल १४९४ रुग्ण पॉझिटिव्ह

राज्यात मागील आठवड्यापासून कोरोना (Corona) रुग्णांत लक्षणीय वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. रविवारी, ५ जून रोजी महाराष्ट्रात १४९४ नवे रुग्ण आढळले आहेत. यामुळे आता उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ६७६७ वर पोहोचली आहे. याशिवाय, दिवसभरात एका रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

राज्यात आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या १,४७,८६६ झाली. दिवसभरात ६१४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून, रुग्णांची संख्या ७७,३८,५६४ झाली आहे. राज्यातील बरे होण्याच दर ९८.०४% एवढा आहे. तर मृत्यू दर १.८७% एवढे आहे.

मुंबई विभागात- ठाणे, नवी मुंबई, उल्हासनगर, भिवंडी निजामपूर, मीरा भाईंदर, पालघर, वसई विरार, रायगड, पनवेल या शहरांचा समावेश आहे. या विभागात १३६२ नव्या रुग्णांची (Corona) नोंद झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPS अधिकाऱ्याने आयुष्य का संपवलं? ९ पानी चिठ्ठीतून झाला धक्कादायक उलगडा

Crime News : संतापजनक! १८ वर्षीय तरुणीवर ७ जणांचा सामूहिक बलात्कार; आरोपींमध्ये भावाचाही समावेश

Dry fruits Ladoo: लहान मुलांसाठी बनवा पौष्टिक ड्रायफ्रुट्स लाडू; सोपी रेसिपी वाचा

Sev Recipe : दिवाळीला घरीच बनवा चटपटीत तिखट शेव, मार्केटपेक्षा चव भारी

Maharashtra Live News Update : रबाळे अपहरण प्रकरणातील मुख्य आरोपी दिलीप खेडकरचा जामीन कोर्टाने नाकारला

SCROLL FOR NEXT