Raj Thackeray Saam TV
मुंबई/पुणे

Raj Thackeray MNS News : मनसेने कोकण पदवीधर मतदारसंघातून माघार का घेतली? नितीन सरदेसाईंनी सांगितलं कारण

Vidhan Parishad Election 2024 : राज ठाकरे यांच्या मनसेने कोकण पदवीधर मतदारसंघातून अभिजित पानसे यांना उमेदवारी दिली होती. मात्र, ऐनवेळी हा निर्णय बदलण्यात आला.

Satish Daud

लोकसभा निवडणुकीत महायुतीला 'सशर्त' पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरे यांच्या मनसेने यंदा कोकण पदवीधर मतदारसंघातून आपला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवला होता. मनसेकडून अभिजित पानसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मात्र, ऐनवेळी ही उमेदवारी मागे घेण्यात आली. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं.

मनसेने ऐनवेळी अभिजित पानसे यांची उमेदवारी मागे का घेतली? असा प्रश्न अनेकांना पडला. दरम्यान, मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना यामागील कारण सांगितलं आहे. कोकण पदवीधर मतदारसंघातून माघार घेण्यामागे राज ठाकरे यांचे दूरगामी राजकीय गणित आहे, असा दावा नितीन सरदेसाई यांनी केला.

देवेंद्र फडणवीस यांनी हे ३ जूनला रात्री शिवतीर्थवर येऊन राज ठाकरे यांची भेट घेतली होती. तेव्हा त्यांनी साहेबांना उमेदवारी मागे घेण्याची विनंती केली, असं सरदेसाई म्हणाले. आज शुक्रवारी सकाळी भाजपचे उमेदवार निरंजन डावखरे शिवतीर्थावर राज ठाकरे यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आले होते.

यानंतर साहेबांनी देवेंद्र फडणवीसांच्या विनंतीला मान देऊन अभिजित पानसे पदवीधर निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरणार नाही, असा निर्णय घेतल्याचं सरदेसाई म्हणाले. तुम्हाला वारंवार पाठिंबा देण्याची वेळ येणार नाही, अशी ग्वाही देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांना दिल्याचं सरदेसाई म्हणाले.

दरम्यान, राजकारणात बऱ्याच गोष्टींचा परिणाम लगेच दिसून येत नाही, काही गोष्टींचा फायदा कालांतराने दिसत असतो. राज ठाकरे मनसेच्या फायद्याचा विचार करुनच निर्णय घेतात, त्यामुळे या निर्णयाचा फायदा काही दिवसांनी दिसून येईल, असा दावा सरदेसाई यांनी केला. दुसरीकडे राज ठाकरे साहेबांनी मला जो आदेश दिला होता, तो मी आधीही पाळला आणि आताही पाळत आहे, असं अभिजित पानसे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026: मुंबईने पंजाबचा खेळ बिघडवला! आता प्लेऑफचं समीकरण काय? कुणाला किती संधी? वाचा नेमकं गणित

Face Care: पिंप्लस, डाग आणि टॅनिंग कमी करायची आहे? मग हा घरी तयार केलेला कुलिंग फेसपॅक करा ट्राय

Maharashtra News Live Update: डॉ.आनंद नाडकर्णींच्या पार्थिवाचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतलं अंत्यदर्शन

राज्यातील प्रशासनात उलटफेर; 4 बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कुणाची कुठे नियुक्ती?

Yavtmal : ह्रदयद्रावक! खेळता खेळता कुलरजवळ गेला, पाण्यात हात घालताच शॉक लागून १४ महिन्यांच्या बाळाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT