Nitin Desai Death Audio Clip Saam Tv
मुंबई/पुणे

Nitin Desai Audio Clips: नितीन देसाई मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट; 'त्या' ११ ऑडिओ क्लिपमध्ये काय? प्रत्येक शब्दातून होणार उलगडा

Nitin Desai Audio Clips: नितीन देसाई यांनी आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी आणि ११ ऑडिओ क्लीप रेकॉर्ड करून ठेवल्याची माहिती आहे. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

Satish Daud

Nitin Desai Death News: प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आपल्या कर्जत येथील एनडी स्टुडिओत गळफास घेत जीवनयात्रा संपवली. नितीन देसाई यांच्या अकाली एक्झिटनंतर संपूर्ण कलाविश्व हादरवून गेलं आहे. त्यांच्या मृत्युबाबत असंख्य प्रश्न उपस्थित होत आहेत.

दरम्यान, नितीन देसाई यांनी आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी आणि ११ ऑडिओ क्लीप रेकॉर्ड करून ठेवल्याची माहिती आहे. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचं वृत्त दिलं आहे. टाईम्सच्या वृत्तानुसार, या ऑडिओ क्लिपमध्ये नितीन देसाई यांनी एनडी स्टुडिओ आणि कर्ज प्रकरणाबद्दल म्हणणं मांडलं आहे.

त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांना विनंती केली आहे. इतकंच नाही, तर देसाई यांनी गळफास घेतला त्या ठिकाणी दोरीने एक धनुष्यबाण चिन्ह देखील काढल्याची माहिती आहे.

टाईम्सच्या वृत्तानुसार, या ऑडिओ क्लिपमध्ये नितीन देसाई यांनी एनडी स्टुडिओ आणि कर्ज प्रकरणाबद्दल म्हणणं मांडलं आहे. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांना विनंती केली आहे. इतकंच नाही, तर देसाई यांनी गळफास घेतला त्या ठिकाणी दोरीने एक धनुष्यबाण चिन्ह देखील काढल्याची माहिती आहे.

कर्जत-खालापूरमध्ये 2005 मध्ये उभारलेल्या भव्य दिव्य एनडी स्टुटिओत नितीन चंद्रकांत देसाई यांनी जगाचा निरोप घेतला. नितीन देसाईंची आत्महत्या सिनेसृष्टीच्या मनाला चटका लावून गेली. देसाई यांच्या आत्महत्येनंतर काही गोष्टी समोर आल्या असून, यात कर्जाचा मुद्दा प्रामुख्याने सांगितला जात आहे.

नितीन देसाईंच्या 11 ऑडिओ क्लिपमध्ये काय?

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, नितीन देसाई यांनी रेकॉर्ड करून ठेवलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये 4 उद्योजकांची नावे आहेत. त्याचबरोबर कर्ज देणाऱ्या कंपन्यांनी आर्थिक फसवणूक केली आणि छळ केला, असे नितीन देसाईंनी या क्लिपमध्ये नमूद केलेले आहे.

त्याचबरोबर एनडी स्टुडिओचा ताबा कर्ज देणाऱ्या कंपन्यांकडे जाणार आहे. त्याला नितीन देसाई यांनी विरोध केला असून या स्टुडिओचा ताबा सरकारने घ्यावा, अशी विनंती देखील त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याकडे केल्याची माहिती आहे.

नितीन देसाईंचा मृत्यू कशामुळे?

पोलिसांनी देसाई यांचा मृतदेह ताब्यात घेतला असून मुंबईतील जे.जे रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. तिथे 4 डॉक्टरांच्या पथकाने देसाई यांच्या पार्थिवाचे शवविच्छेदन केले. दरम्यान, शवविच्छेदन अहवाल समोर आला असून प्राथामिक माहितीनुसार, गळफास घेतल्यामुळे श्वास कोंडून त्यांचा मृत्यू झाल्याचे अहवालातून समोर आले आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! विजयाच्या मेळाव्यानंतर राजकीय घडामोडींना वेग; ठाकरे गटाकडून भाजपच्या मोठ्या नेत्याला ऑफर?

IND vs ENG 2nd Test Score: शुबमनकडून इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई; दुसऱ्या डावातही ठोकलं शतक

India Bangladesh Tour: टीम इंडियाचा बांगलादेश दौरा का झाला रद्द? काय आहे कारण,जाणून घ्या

Shaktipeeth Expressway :'शक्तीपीठ' ठरणार पांढराहत्ती? शेतकऱ्यांचं नुकसान, शेकडो गावांना फटका बसणार; राजू शेट्टींनी सांगितले विकासाचे अडथळे

Satara News: थरारक! साताऱ्यातील खंबाटकी घाटात ट्रकचा जळून कोळसा; वाहतूक ठप्प, VIDEO

SCROLL FOR NEXT