15 कोटींचा 'पेंग्वीन' ठेका कोणासाठी; महापौर किशोरी पेडणेकरांना नितेश राणेंचा सवाल SaamTV
मुंबई/पुणे

15 कोटींचा 'पेंग्वीन' ठेका कोणासाठी; महापौर किशोरी पेडणेकरांना नितेश राणेंचा सवाल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : काल महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांनी पत्रकार परिषदेत कोणत्याही प्रकारे आपण पेंग्वीन देखभालीचे टेंडर (Tender) मागे घेणार नसल्याचं स्पष्ट केलं. तसेच या टेंडरच्या उत्पादनातून पालिकेला फायदा होत आहे, पालिकेच्या उत्पादनात त्यामुळे वाढ होतं असल्याचही महापौर म्हणाल्या होत्या त्यांच्या याच वक्तव्यावरती भाजपा आमदार नितेश राणेंनी (MLA Nitesh Rane) आक्षेप घेतला आहे. यासाठी त्यांनी थेट महापौर किशोरी पेडणेकरांना पत्र पाठवलं आहे. (Nitesh Rane sent a letter to Mayor Kishori Pednekar)

'आपण मुंबईच्या प्रथम नागरिक आहात आणि ही सन्मानाची बाब आहे मात्र आपण मुंबईकरांची दिशाभूल केली ती अत्यंत निंदनीय आहे. आम्हीही समजू शकतो की ‘पेंग्वीन’च्या दबावामुळे आपण खोट्याला खरं सिद्ध करण्याचा हास्यास्पद प्रयत्न करत आहात. 2017 ते 2018 या आर्थिक वर्षामध्ये 17 लाख 57 हजार 059 होती मात्र मागील दोन वर्षांमध्ये पर्यटकांची संख्या कमी झाली ती 10 लाख 66 हजार 036 वर आली. त्यामुळे 3 वर्षांत 7 लाख पर्यटकांची संख्या घटली आहे'. तसेच महसूल (Revenue) वाढला म्हणून आकर्षण वाढले असा भ्रमीत करण्याचा प्रयत्न आपण केला आहे आपण 5 रुपयांवरुन राणीबागेचे प्रवेश शुल्क 50 रुपयांवरती नेलं, या वाढीव शुल्कामुळे महसूल वाढलेला आहे पर्यटकांची (Tourists) संख्या वाढलेली नाही असंही राणेंनी आपल्या पत्रात (Letter) नमुद केलं आहे.

तसेच जर वाघाची देखभाल महापालिका कर्मचारी स्वतःकरु शकतात तर पेंग्वीनची (Penguin) का नाही ? हा पंधरा कोटीचा पेंग्वीन देखभालीचा ठेका कोणासाठी ? असा सवाल त्यांनी या पत्रात उपस्थित केला आहे.

दरम्यान राणीची बाग (Ranibag) ही मुंबईमधील लहान मुलांसाठी आईवडीलांकडे हट्ट करून जाण्याचे ठिकाण होते. मात्र एका ‘पेंग्वीन’च्या बालहट्टामुळे त्यांच्या हक्काचे खेळण्याचे-विरंगुळ्याचे स्थानही आपण अव्वाच्या सव्वा तिकीट दर लावून हिरावून घेतले तसेच बागेचे दरवाचे अजूनही मुलांसाठी उघडे केले नाहीत तर मग कुठल्या बाळाचा छंद पुरविण्यासाठी कोट्यावधीं रुपयांची उधळपट्टी होतेय? असा टोलाही त्यांनी नाव न घेता पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंना (Aditya Thackeray) लगावला आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs BAN: पहिल्याच डावात केलेल्या या 3 चुका टीम इंडियाला महागात पडू शकतात

IND vs BAN, 1st Test: टीम इंडियाचा डाव आटोपला! जडेजाचं शतक थोडक्यात हुकलं, बांगलादेशचा युवा गोलंदाज चमकला

Jalna Accident : जालन्यात एसटी बस आणि ट्रक अपघातात आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारे PHOTO पाहा

Chandrakant Patil News : खडसेंमुळेच राजकारणाचा स्तर खाली घसरलाय; आमदार चंद्रकांत पाटील यांचा आरोप

Metro Ticket Booking: मेट्रोच्या तिकीटासाठी रांगेत उभं राहायची गरज नाही; काही मिनिटात ऑनलाइन तिकीट काढा

SCROLL FOR NEXT