Nita Ambani News Saam Tv
मुंबई/पुणे

Nita Ambani News : सासू असावी तर अशी...नीता अंबानींकडून सुनबाईला तब्बल ६४० कोटी रूपयांचा व्हिला भेट!

Nita Ambani Gifts Villa To Daughter In Law Radhika : नीता अंबानी यांनी राधिका मर्चंटला लग्नाची भेट म्हणून व्हिला गिफ्ट केलाय. त्याची किंमत सुमारे ६४० कोटी असल्याचं समोर आलंय.

Rohini Gudaghe

मुंबई : नीता अंबानी आणि मुकेश अंबानी यांनी त्यांची धाकटी सून राधिका मर्चंटला लग्नाची अप्रतिम भेट दिलीय. नीता अंबानी यांनी राधिका मर्चंटला दुबईमध्ये ६४० कोटी रुपयांचा एक अप्रतिम व्हिला भेट म्हणून दिला आहे. हा व्हिला पाम जुमेराह परिसरामध्ये असून तो अतिशय सुंदर असल्याची माहिती मिळतेय.

नीता अंबानी आणि मुकेश अंबानी यांनी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नानंतर नीता अंबानी यांनी सूनबाई राधिकाला एक अप्रतिम भेट दिल्याचं समोर (Nita Ambani Gifts) आलंय. नीता अंबानी यांनी सून राधिका मर्चंटला दुबईमध्ये एक भव्य आणि आलिशान व्हिला दिलाय. हा व्हिला राधिकासाठी खास सरप्राईज होता, असं सांगितलं जातंय. आपण या व्हिलाबद्दल सविस्तर जाणून घेवू या.

राधिका मर्चंटला लग्नाची भेट

नीता अंबानी यांनी राधिका मर्चंटला दिलेली भेट खूपच विलक्षण आहे. या व्हिलाची किंमत ६४० कोटी रूपये असून तो पाम जुमेराह परिसरात आहे. हा व्हिला शहरातील सर्वात महागड्या असलेल्या मालमत्तांपैकी एक (Radhika Merchant) आहे. या व्हिलाची खासियत म्हणजे त्याचे आलिशान इंटीरियर, सजावट आणि ७० मीटर लांब बीच आहे. या व्हिलामध्ये विवाहित जोडप्यासाठी संपूर्ण गोपनीयतेची पूर्ण काळजी घेण्यात आलीय. व्हिला (Villa) समुद्रकिनाऱ्यावर असल्यामुळे अरबी आखाताचे विस्मयकारक दृश्य तेथून दिसते. त्यामुळे वास्तूचे आकर्षण आणखीनच वाढत आहे.

दुबईमधील भव्य आणि आलिशान व्हिला

या व्हिलामध्ये इटालियन संगमरवरी आणि सुंदर कलाकृतींनी सजवलेल्या १० लक्झरीयस बेडरूम आहेत. व्हिलामध्ये जेवण करण्यासाठी एक प्रशस्त मोठी खोली देखील आहे. या खोलीत जेवणासाठी भव्य टेबल (Nita Ambani Gift To Radhika Merchant) आहेत. यामुळे अंबानी कुटुंबाच्या भव्य पार्टीसाठी योग्य सेटिंग निर्माण झालीय. व्हिलामध्ये एक अत्याधुनिक स्विमिंग पूल देखील आहे. १२ जुलाई २०१४ रोजी अनंत आणि राधिका यांचा विवाह सोहळा पार पडला होता. लग्नाची भेट म्हणून नीता अंबानी यांनी राधिका आणि अनंतला हा अलिशान व्हिला गिफ्ट केलेला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Earrings Designs: साडीपासून ते लेहेंग्यापर्यंत...; या कानातल्यांच्या डिझाईन्स आहेत कोणत्याही आऊटफिटसाठी परफेक्ट चॉइस

Raj Thackeray: किल्ल्यांवरील नमो केंद्र फोडून काढू; राज ठाकरेंचा सरकारला गंभीर इशारा

Maharashtra Live News Update: रोहित आर्य एन्काऊंटर प्रकरणाचा तपास क्राइम ब्रँचकडे?

Raj Thackeray: सुट्टी दिली नाही तर बॉसच्या कानाखाली मारा; राज ठाकरे असं का म्हणाले? VIDEO

Ind vs Aus Semi Final: ऑस्ट्रेलियाचा तडाखा, ३३९ धावांचं टार्गेट; भारत फायनल गाठणार का?

SCROLL FOR NEXT