nine cows electrocuted to death in maval  Saam Tv
मुंबई/पुणे

Maval News : विजेचा धक्का लागून नऊ गायींसह वासराचा मृत्यू; तार तुटल्याने घडली घटना

या गायींवर शेतक-याचा दुग्धव्यवसाय सुरू होता.

दिलीप कांबळे

Maval News :

मावळ तालुक्यातील कासारसाई येथे शेतकऱ्याच्या गोठ्यात घरातील विजेचा प्रवाह उतरून नऊ गायी आणि एका वासराचा मृत्यू झाला आहे. या नऊ गायींपैकी सहा गायी गाभण होत्या अशी माहिती शेतकरी विनायक शिखरे यांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली. (Maharashtra News)

विनायक शिखरे म्हणाले गोठ्यात बारा जनावरे होती. त्यापैकी दोन बाहेर होती. ती सुरक्षित आहेत. मध्यरात्री पडलेल्या वादळी पावसाने विजेची तार गोठ्यावर पडली होती. रात्रीच्या सुमारास गावातील विद्युत प्रवाह बंद होता. सकाळी विद्युत पूरवठा सुरु झाल्यावर या गायींना विजेचा धक्का लागला. त्यात त्या मृत्यूमुखी पडल्या.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या गाेठ्यास पशुवैद्यकीय अधिकारी यांनी भेट दिली. त्यांनी गायींची तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे विनायक शिखरे यांचे बारा लाखांचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले. या गायींवर त्यांचा दुग्धव्यवसाय सुरू होता. दरम्यान पशुसंवर्धन खात्याने पंचनामा करून शेतकऱ्यास नुकसान भरपाई दयावी अशी मागणी मुळशीतील शेतकरी करू लागले आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss Tips: किती पावले चालण्याने आठवड्यात १ किलो वजन कमी होईल?

Gyanesh Kumar : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पद्मभूषण द्या; भाजप नेत्याची मागणी

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींसाठी खुशखबर, अवघ्या काही तासांत खात्यात पैसे जमा होणार, महत्त्वाची अपडेट आली समोर

Pune Ganeshotsav: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे विसर्जन, पाहा व्हिडिओ

मणिपुरात पुन्हा हिंसाचार उफाळला; केंद्र सरकारनं तीन राज्यांसाठी घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT