Pawar And Rane Saam Tv
मुंबई/पुणे

पवार साहेब दाऊदची व्यक्ती, मला संशय आहे आणि राहणार; राणेंचं ट्विट

निलेश राणे यांनी ट्विट करत आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे राणे पितापुत्र आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. यापूर्वी नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर आता निलेश राणे (Nilesh Rane) आणि नितेश राणे (Nitesh Rane) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर निलेश राणे यांनी ट्विट करत आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

ट्विट करत नितेश राणे म्हणाले की, कितीही माझ्यावर केसेस घातले तरी मी म्हणतच राहणार, मला संशय आहे आणि राहणारच की पवार साहेब (Sharad Pawar) दाऊदची व्यक्ती आहे. असं ट्विट निलेश राणे यांनी केलं आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

निलेश राणे आणि नितेश राणे जाणीपूर्वक समाजामध्ये हिंदू मुस्लिम तेढ निर्माण करून दंगली घडतील, असे भाष्य केल्यामुळे तसेच शरद पवार यांचे नाव दाऊद इब्राहिमशी जोडून त्यांच्या जीवितास धोका निर्माण केल्याबद्दल त्यांच्यावर मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबद राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सूरज चव्हाण यांनी तक्रार केली होती. काल शनिवारी उशीरा रात्री अनेक कलमांअंतर्गत त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वीच भाषण करत असताना नितेश राणे म्हणाले होते की, अनिल देशमुख मराठा समाजातून येतात त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होते आणि नवाब मलिक मुस्लीम समाजातून येत असल्याने त्यांच्यावर कारवाई होत नाही असे भाष्य केले होते. हे सगळं दाऊन इब्राहिमच्या सांगण्यावरुन होत आहे असे देखील ते यावेळी म्हणाले होते. शरद पवार यांचेही दाऊदशी संबंध असल्याने ते नवाब मलिक यांचा राजीनामा घेत नसल्याचं विधान नितेश राणे यांनी केलं होतं. तर दुसरीकडे निलेश राणे यांनी देखील पशरद पवारांचे थेट दाऊदशी संबंध असल्याचे भाष्य केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT