Vaishnavi Hagawane Saam
मुंबई/पुणे

Vaishnavi Hagavane: वैष्णवी प्रकरणात पोलिसांची धडक कारवाई, निलेश चव्हाण आत्मसमर्पण करणार

Vaishnavi Hagavane Case: मुळशी तालुक्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणातील सहावा आरोपी निलेश चव्हाण आज पुणे पोलिसांसमोर सरेंडर करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

Bhagyashree Kamble

मुळशी तालुक्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणातील सहावा आरोपी निलेश चव्हाण आज पुणे पोलिसांसमोर सरेंडर करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी चव्हाणच्या घरावर छापा टाकत काही वस्तू ताब्यात घेतले. तसेच निलेश चव्हाणच्या भावाला आणि वडिलांना वारजे पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. आता तो स्वत: पोलिसांसमोर आत्मसमर्पण करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर राज्यात संतापाची लाट उसळली. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत पाच आरोपींना अटक केली आहे. सासरा, सासू, पती, नणंद आणि दीर, हगवणे कुटुंबातील पाचही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मात्र, सहावा आरोपी निलेश चव्हाण हा अद्याप पोलिसांच्या तावडीत सापडलेला नाही.

निलेश चव्हाण फरार असून, पोलीस त्याच्या शोधात आहे. पोलिसांनी आरोपी निलेशच्या घरावर छापा टाकत त्याचा लॅपटॉप यासह काही वस्तू जप्त केल्या आहेत. तर, वारजे पोलिसांनी निलेश चव्हाणच्या भावाला आणि वडिलांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. त्याचे हगवणे कुटुंबाशी संबंध कसे होते? त्यांची ओळख कधीपासून आहे? याचा तपास सुरू आहे.

वैष्णवी हगवणेच्या निधनानंतर तिचे बाळ निलेश चव्हाणकडे कोणाच्या माध्यमातून देण्यात आले? चव्हाणकडे ते किती काळ होते आणि त्याने ते पुढे कोणाकडे दिले? याचीही चौकशी सुरू आहे. यासंदर्भात काही आर्थिक व्यवहार झाले होते का? याचा तपास केला जात आहे.

कस्पटे कुटुंबीय बाळाचा ताबा घेण्यासाठी चव्हाणकडे गेले असता, त्याने बंदुकीचा धाक दाखवला, असा गंभीर आरोप करण्यात आला आहे. यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. सध्या पोलीस निलेश चव्हाणचा शोध घेत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT