Aaditya Thackeray News Saam tv
मुंबई/पुणे

Aaditya Thackeray News: येत्या २-३ दिवसांत राज्याचा खरा मुख्यमंत्री कोण हे स्पष्ट होईल; आदित्य ठाकरेंचं मोठं भाकीत

'येत्या दोन-तीन दिवसात कळेल की खरा मुख्यमंत्री कोण हे स्पष्ट होईल, असं वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केलं आहे.

Vishal Gangurde

गिरीश कांबळे

Aaditya Thackeray News: राज्यात शिंदे गट आणि भाजप सरकारला अजित पवारांच्या रुपाने नवा साथीदार लाभला आहे. अजित पवार गट सत्तेत सामील झाल्यानंतर राज्याचा मुख्यमंत्री बदलण्यात येणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. यावर आमदार आदित्य ठाकरे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. 'येत्या दोन-तीन दिवसात कळेल की खरा मुख्यमंत्री कोण हे स्पष्ट होईल, असं भाकीत आदित्य ठाकरे यांनी केलं आहे. (Latest Marathi News)

आदित्य ठाकरे यांनी बीडीडी प्रकल्पाला भेट दिली. त्यादरम्यान त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी आदित्य ठाकरे यांनी राज्यातील विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. आदित्य ठाकरे म्हणाले, 'आता काय झाले आहे की खरा मुख्यमंत्री कोण हे संभ्रम आहे. येत्या दोन तीन दिवसात कळेल की खरा मुख्यमंत्री कोण हे स्पष्ट होईल'.

आगामी सिनेट निवडणुकीवर भाष्य करताना आदित्य ठाकरे म्हणाले, 'ही तिसरी निवडणूक आहे, या निवडणुकीला हाईप करण्याची गरज नाही. ज्यांना मदत करायची आहे. ते करू शकतात'.

अजित पवार आणि शरद पवार भेटीवर भाष्य करताना आदित्य ठाकरे म्हणाले, 'सामनात जे आले, ती पक्षाची भूमिका आहे. संजय राऊत यांनी जे मांडलं, तीच आमची भूमिका आहे'.

बीडीडी प्रकल्पाबाबत सांगताना आदित्य ठाकरे म्हणाले, 'अपेक्षित होता तसा, या प्रकल्पाचा विकास चालू आहे . आपल्या काळात हा प्रकल्प सुरू झाला होता. माझी सवय आहे की, जे काम आमच्या काळात सुरू झाले आहे, त्यावर मी लक्ष ठेवून असतो. या लोकांच्या ट्रान्झिट कॅम्पमध्ये पाण्याचा प्रश्न आहे. २५ मजले तयार झाले आहे, मी प्रकल्प बघून आलो, परिसरात २ बीएचके आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Long Validity Plan: 'या' प्लॅनमध्ये मिळणार १९९९ रुपयांमध्ये ३३० दिवसांचे फायदे; कॉलिंग, डेटा आणि मेसेजिंगची सुविधा

Bollywood News : अक्षय-हृतिकची कोर्टात धाव, Bollywood मध्ये AIचा गैरवापर, बॉलिवूड हादरले | VIDEO

Crime: कोल्हापुरात पहाटे रक्तरंजित थरार! दारुसाठी पैसे दिले नाही, तरुणाने आईच्या डोक्यात घातला वरवंटा

Marathwada Farmer: संकट काही संपेना! आधी अतिवृष्टीने झोडपलं, आता मदत मिळायला अडथळा, e-KYC मुळे ११ लाख शेतकऱ्यांची दिवाळी कडू

Priya Berde : प्रिया बेर्डे पुन्हा एकदा छोटा पडदा गाजवायला सज्ज, 'या' मालिकेत साकारणार महत्त्वाची भूमिका

SCROLL FOR NEXT