Bhandup News  Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Crime News : विवाहितेला सासरच्यांनी जिवंत जाळलं; भांडुपमधील घटनेने खळबळ

Newly married woman set on fire : सध्या महिलेवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. भांडूपच्या सोनापूरमधील या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मयूर राणे

Mumbai News :

मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कौटुंबिक वादातून विवाहितेला सासरच्या लोकांनी जिवंत जाळल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेत महिला जवळपास ९० टक्के भाजली आहे.

सध्या महिलेवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. भांडूपच्या सोनापूरमधील या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

प्राथमिक माहितीनुसार, घरात झालेल्या वादातून महिलेला आज (२७ डिसेंबर) सासरच्या मंडळींनी जिवंत जाळलं आहे. दीर, नणंद दोघांनी केरोसीन ओतून महिलेला जिवंत जाळल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांना दीर आणि नणंद दोघांनाही ताब्यात घेऊन चौकशी सुरू आहे. (Latest News)

महिलेला आधी फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आता ऐरोली येथील बर्न हॉस्पिटलला हलवण्यात आलं आहे. या प्रकरणी भांडुप पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. वाद नेमका काय झाला याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलीस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai News: 'भोजपुरी बोला, मगच जेवण मिळेल', मुंबईत परप्रांतीयांची दादागिरी; VIDEO व्हायरल

Anganwadi Nutrition Food : पोषण आहारात गडबड आढळली तर खैर नाही! आदिती तटकरे यांचा अधिकाऱ्यांना इशारा

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Kissing Car : साडेतीन तासांत कारवर ३४०० 'Kisses'! रीलचा नाद पडला महागात, पोलिसांनी केली कारवाई

डोंबिवलीत भाजप अन् मनसेत 'डिजिटल युद्ध'! एआय व्यंगचित्रं आणि मीम्सच्या माध्यमातून थेट नेत्यांवर निशाणा

SCROLL FOR NEXT