मुंबई/पुणे

Navi Mumbai Crime: नेरूळ स्टेशनभोवती गुंडाराज; थेट पोलिसांवरच उचलला हात

Nerul Railway Station: नेरुळ रेल्वे स्थानकाजवळ एका समाजकंटकाने कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्याचा प्रयत्न झालाय.

Bharat Jadhav

  • नेरूळ पश्चिम रेल्वे स्टेशन परिसरात भरदिवसा धक्कादायक घटना घडली.

  • एका माथेफिरूने थेट पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

  • आरोपीच्या हातात धारदार शस्त्र असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

नेरूळ पश्चिम रेल्वे स्टेशन परिसरात कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे काढणारी एक धक्कादायक घटना भरदिवसा घडली आहे. स्टेशनच्या वर्दळीच्या ठिकाणी एका माथेफिरूने थेट कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवरच धारदार शस्त्राने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या थरारामुळे परिसरात काही काळ प्रचंड घबराट आणि पळापळ निर्माण झाली होती.

वाईन शॉपबाहेर तळीरामांचा गोंधळ; महिला व विद्यार्थी त्रस्त

स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, स्टेशन परिसरातील वाइन शॉपबाहेर दररोज तळीरामांची मोठी गर्दी जमते. भररस्त्यात, जाहीरपणे मद्यप्राशन करून हे असामाजिक तत्व येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांना त्रास देतात. विशेषतः महिला, विद्यार्थिनी आणि ज्येष्ठ नागरिकांना या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. अनेकदा तक्रारी करूनही रेल्वे पोलीस किंवा स्थानिक पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने या गुंडांचे धाडस आता पोलिसांवरच हात उचलण्याइतके वाढले आहे.

​नागरिकांची संतप्त मागणी:

या घटनेनंतर नेरूळकरांमध्ये तीव्र संताप आणि भीतीचे वातावरण आहे. स्टेशन परिसरात तात्काळ नियमित पोलीस गस्त (पेट्रोलिंग) वाढवावी, सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी आणि पोलिसांवर हल्ला करणाऱ्या आरोपीला अद्दल घडवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yashasvi Jaiswal: बोल्ड झाल्यानंतर यशस्वी जैयस्वालचा संताप अनावर, श्रीलंकन गोलंदाजाशी थेट मैदानात भिडला

Health Tips : जेवल्यावर १ घोट पाणीही ठरू शकतं विषारी? डॉक्टरांनी दिला धक्कादायक इशारा

Maharashtra News Live Update: नांदेड जिल्ह्याला शिवसेनेचा पालकमंत्री देण्याची मागणी

EV Charging : इलेक्ट्रिक गाड्यांचे चार्जिंग आता इमारतीतच; नव्या सोसायट्यांसाठी EV पॉईंट्स अनिवार्य होण्याची शक्यता

Toxic Movie : सुपरस्टार अभिनेत्याच्या चित्रपटाच्या प्री-रिलीज इव्हेंटदरम्यान मोठी दुर्घटना, सेटअप अचानक कोसळला अन्...

SCROLL FOR NEXT