ulhas river
ulhas river saam tv
मुंबई/पुणे

उल्हास नदीला पूर आला, मासेमारी करण्यासाठी गेलेला तरुण पाण्यात उतरला, अन्....

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नेरळ : कर्जत तालुक्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून मुसळधार पावसाचा (heavy rainfall) जोर वाढल्याने उल्हास नदीला पूर आला आहे. पावसाची संततधार सुरुच असल्याने उल्हास नदी दुथडी भरून वाहत आहे. पावसाळा सुरु झाला की, उल्हास नदीकाठी (ulhas river flood) असलेल्या नेरळ शहरातील नागरिक मासेमारी करण्यासाठी नदीत जात असतात. आजही नेरळचा एक तरुण मासेमारी करण्यासाठी उल्हास नदीकाठी गेला होता. काही तासांपासून पावसाची कोसळधार सुरुच असल्याने उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडली होती. परंतु, मासेमारी करण्यासाठी गेलेला तरुण नदीला पूर आला असतानाही पाण्यात उतरला. पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने (drowned in flood water) हा तरुण पूराच्या पाण्यात वाहून गेला. या घटनेमुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे घाटावरून रायगड जिल्ह्यात वाहत येणाऱ्या उल्हास नदीला पूर आला आहे. त्याचवेळी नेरळ येथील एक तरुण मासेमारी करण्यासाठी उल्हास नदीच्या पाण्यात उतरला. पूराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने तरुण पाण्याचा प्रवाहाद्वारे बदलापूरच्या दिशेनं वाहून गेला. ही थरारक घटना मोबाईलच्या कॅमेरात कैल झाली आहे. दरम्यान, उल्हास नदीच्या पाण्यात वाहून गेलेला तरुणाची माहिती अद्याप मिळाली नाही.

Edited By - Naresh Shende

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya: आजचे राशिभविष्य, २० मे २०२४ : मेषसह ४ राशींना मिळणार नशीबाची उत्तम साथ, तुमची रास कोणती?

Horoscope Today: तुमच्यासाठी सोमवार सुखाचा ठरेल की दुखाचा? वाचा राशिभविष्य

31km मायलेज, Z सीरीज इंजिन; पहिल्यांदाच सनरूफसह येणार मारुतीची नवीन कार

Kia आणि Toyota च्या या 7 सीटर कार्सची किंमत 11 लाखांपेक्षाही आहे कमी, मिळतात हाय क्लास फीचर्स

Lok Sabha election: मुंबई, ठाणे, रायबरेलीसह ४९ जागांवर आज मतदान, ५व्या टप्प्यात या दिग्गजांचं भवितव्य पणाला

SCROLL FOR NEXT