neet exam news  Saam tv
मुंबई/पुणे

नीट पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; आतापर्यंत ११ जणांच्या मुसक्या आवळल्या, आरोपींची यादी समोर

neet exam news : नीट पेपर फुटी प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. आतापर्यंत ११ जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

Vishal Gangurde

नीट पेपर फुटी प्रकरणात मोठी अपडेट

सीबीआयकडून आतापर्यंत ११ जणांच्या आवळल्या मुसक्या

पुण्यात आज आणखी एकाला केली अटक

नीट पेपर फुटी प्रकरणात सीबीआयने कारवाईचा धडा लावला आहे. सीबीआयने आतापर्यंत ११ जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी महाराष्ट्रात पुणे, नाशिक, पुण्यात मोठी कारवाई केली. या प्रकरणी महाराष्ट्राबाहेर जयपूरमध्येही कारवाई केली आहे.

सीबीआयने आज शुक्रवार पुण्यात आणखी एकावर कारवाई केली. सीबीआयने मनीषा हवालदारला अटक केली आहे. या कारवाईनंतर सेठ हरिलाल सराफ प्रशाळेच्या मुख्याध्यापिका असणाऱ्या हवालदार हिच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. विद्या प्रसारिणी सभेच्या व्यवस्थापकीय बैठकीनंतर मनिषा हवालदारचे निलंबन करण्यात आलंय. मनिषा हवालदारने केलेल्या गैरकृत्याचा शालेय व्यवस्थापनाकडून निषेध करण्यात आलाय.

आतापर्यंत कोणाकोणाला अटक केली?

नीट पेपर फुटी प्रकरणात आतपर्यंत ११ जणांना अटक करण्यात आली आहे. सीबीआयने आत्तापर्यंत या प्रकरणात ११ जणांना अटक केली आहे. मनिषा वाघमारे, मनिषा मांढरे आणि मनिषा हवालदार या तीन महिलांना अटक करण्यात आली आहे. एकूण ११ पैकी ४ जणांना पुण्यातून अटक करण्यात आली आहे.

पेपर फुटी प्रकरणात आत्तापर्यंत सीबीआयने अटक केलेले आरोपी

पी. व्ही. कुलकर्णी: पुणे

मनीषा वाघमारे: पुणे

मनिषा मांढरे: दिल्ली

शुभम खैरनार: नाशिक

धनंजय लोखंडे: अहिल्यानगर

यश यादव: गुरुग्राम

मांगीलाल बिवाल: जयपूर

विकास बिवाल: जयपूर

दिनेश बिवाल: जयपूर

डॉ. राहुल शिरुरे: पुणे

मनिषा हवालदार: पुणे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT