NEET 2026 Paper Leak Case Explained  Saam TV marathi
मुंबई/पुणे

NEET पेपर २०२६ कसा फुटला? NTA च्या तज्ज्ञांनीच रचला कट; A to Z टाइमलाईन समोर

NEET 2026 Paper Leak Timeline: पेपरफुटी प्रकरणात CBI च्या दोषारोपपत्रातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. NTA तज्ज्ञांपासून कोचिंग क्लासेस, डॉक्टर आणि मध्यस्थांपर्यंत प्रश्न कसे पोहोचल्याचा आरोप आहे, याची A to Z टाइमलाईन जाणून घ्या.

Akshay Badve

NEET 2026 Paper Leak Case Explained : देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या 'नीट' (NEET) परीक्षा २०२६ च्या पेपरफुटी प्रकरणाचा सीबीआयने (CBI) अखेर पर्दाफाश केला आहे. न्यायालयामध्ये सादर केलेल्या हजारो पानांच्या दोषारोपपत्रातून (Charge-sheet) पेपर कसा फुटला, तांत्रिक पुरावे, हस्तलिखित नोट्स आणि पैशांचा व्यवहार कसा झाला, याचे संपूर्ण सत्य समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या (NTA) कमिटीवर असलेल्या तीन तज्ज्ञांनीच या गोपनीयतेचा भंग करून पेपर फुटल्याची 'सप्लाय चेन' तयार केली होती.

जीवशास्त्र, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र या तिन्ही विषयांच्या प्रश्नपत्रिका बाहेर काढण्यासाठी या तज्ज्ञांनी आपल्या पदाचा गैरफायदा घेतला. कागदाच्या कपट्यांवर प्रश्न लिहून ठेवणे, प्रश्न आठवून लिहून काढणे आणि ते पुढे मध्यस्थांमार्फत कोचिंग क्लासेसच्या मालकांपर्यंत पोहोचवणे, असा संपूर्ण कट रचण्यात आला होता. पुण्यातील कोचिंग क्लासेस, ब्युटी पार्लरच्या मालकीण, लातूरचे डॉक्टर आणि हरियाणा-जयपूरमधील दलालांपर्यंत हा पेपर कसा पोहोचला, याची 'A to Z' टाइमलाईन आता समोर आली आहे.

जाणून घ्या पेपरफुटीची सर्व टाईमलाईन

जीवशास्त्र, सायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र विषयाचे तज्ञ म्हणून मनिषा मांढरे, प्रल्हाद कुलकर्णी आणि मनिषा हवालदार हे एन टी ए च्या तज्ञ कमिटी वर होते कार्यरत

या तिघांनी परीक्षेतील गोपनीय साहित्यापर्यंत असलेल्या प्रवेशाच्या अधिकाराचा घेतला गैरफायदा

भौतिकशास्त्राचा पेपर

मनिषा हवालदार या भौतिकशास्त्राच्या तज्ञ होत्या

हवालदार यांनी भौतिकशास्त्राच्या प्रश्नांच्या एका संचाचे भाषांतर तर तीन संचांतील प्रश्नांचे "प्रूफरीडिंग” केले

एनटीएच्या गोपनीय विभागाच्या परिसरातून दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी परतल्यानंतर प्रश्न लक्षात ठेवून ते लिहून काढत असत

त्यानंतर हे प्रश्न त्यांनी प्रथम पुण्यातील एका कोचिंग सेंटरमध्ये भौतिकशास्त्राचे शिक्षक असलेल्या तेजस शाह यांच्यापर्यंत पोहोचवले जात असल्याचा आरोप

जीवशास्त्राचा पेपर

जीवशास्त्र विषयासाठी एन टी ए मध्ये मनिषा मांढरे या तज्ञ म्हणून कार्यरत होत्या. त्यांनी पुण्यातील ब्युटी पार्लरच्या मालक आणि मध्यस्थी मनिषा वाघमारे यांना प्रश्न पाठवल्याचा आरोप करण्यात आला आहे. वाघमारे यांनी रसायनशास्त्राचे प्रश्नही गोळा केले होते असा आरोप आहे.

त्यानंतर त्यांनी हे प्रश्न धनंजय लोखंडे याच्याकडे पाठवले. लोखंडे ने पुढे वितरणासाठी ते शुभम खैरनार कडे दिल्याचे सीबीआयने म्हटले आहे. हे प्रश्न हरियाणातील गुरुग्राम येथील यश यादव पर्यंत पोहोचले आणि त्यानंतर जयपूर येथील मांगीलाल बिवाल, दिनेश बिवाल आणि विकास बिवाल यांच्यासह इतरांमध्ये त्याचे वितरण करण्यात आल्याचा आरोप तपास यंत्रणेने केला आहे

रसायनशास्त्राचा पेपर

एन टी ए मध्ये रसायनशास्त्र विषयासाठी प्रल्हाद कुलकर्णी हे तज्ञ म्हणून कार्यरत होते. "रफ वर्क" करण्यासाठी लागणाऱ्या छोट्या कागदाच्या चिंध्यांवर त्यांनी काही प्रश्न आणि त्यांचे उत्तरे लिहून घेतले होते असा आरोप आहे. दिल्लीतील हॉटेल मध्ये इतर सोपे प्रश्न आणि त्याचे उत्तरं ते लिहून काढत.

रसायनशास्त्राचे प्रश्न दोन माध्यमांतून प्रसारित करण्यात आल्याचा आरोप आहे. त्यापैकी एका मध्ये मनिषा वाघमारे यांचा समावेश होता, तर दुसऱ्या माध्यमातून लातूर येथील डॉक्टर मनोज शिरुरे यांचा सहभाग असल्याचे सीबीआयने म्हटले आहे. या डॉक्टरांनी हे प्रश्न महाराष्ट्रातील लातूर येथील आरसीसी कोचिंग इन्स्टिट्यूटचे मालक शिवराज मोटेगावकर यांच्याकडे पाठवल्याचा आरोप सीबीआयने केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बाभुळगांव वरून आंदोलक विद्यार्थी अमरावतीसाठी रवाना

Shocking : "..तू पण माझ्यावर प्रेम कर" एकतर्फी प्रेमातून तरुणीने संपवले आयुष्य; सांगलीतील धक्कादायक घटना

8th Pay Commission: ₹18,000 वरून पगार थेट ₹72,000? 8व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, जाणून घ्या संपूर्ण गणित

Famous Actor : मृत्यूच्या दाढेतून परतला प्रसिद्ध अभिनेता! "काही तासांपूर्वी आम्ही तिथेच होतो..." सांगताना अंगावर आला काटा

Actress Injured: चेहऱ्यावर सूज अन् ओठांवर जखमा! प्रसिद्ध अभिनेत्रीची अवस्था पाहून चाहते हादरले; सांगितला धक्कादायक अनुभव

SCROLL FOR NEXT