इंधन दरवाढीविरोधात अंबरनाथमध्ये सिलेंडरची अंत्ययात्रा काढत राष्ट्रवादीचे आंदोलन अजय दुधाणे
मुंबई/पुणे

इंधन दरवाढीविरोधात अंबरनाथमध्ये सिलेंडरची अंत्ययात्रा काढत राष्ट्रवादीचे आंदोलन

इंधन दरवाढीविरोधात केंद्र सरकारचा निषेध म्हणून आज अंबरनाथमधील शिवाजी चौकात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सिलेंडरची अंत्ययात्रा काढून आंदोलन करण्यात आले.

अजय दुधाणे

अंबरनाथ: देशात महागाईचा भडका उडाला असून पेट्रोल, डिझेल तसेच घरगुती गॅसच्या  किंमती झपाट्याने वाढत आहेत. १०७ रुपयांच्यावर पेट्रोलचे दर गेलेले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचे राज्य अध्यक्ष जयंत पाटील यांच्या आदेशानुसार केंद्र सरकारचा निषेध म्हणून आज अंबरनाथमधील शिवाजी चौकात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सिलेंडरची अंत्ययात्रा काढून आंदोलन करण्यात आले. (NCP's agitation in Ambernath against modi government because of fuel price hike)

हे देखील पहा -

अंबरनाथ राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सदाशिव पाटील आणि महिला शहराध्यक्ष पूनम शेलार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी केंद्र सरकार विरोधात प्रचंड घोषणाबाजी करून केंद्र सरकारचा निषेध नोंदविण्यात आला.

मोदी सरकारने केंद्रात सत्तेवर येण्यापूर्वी अनेक आश्वासने देशातील जनतेला दिली होती, मात्र कोणतीच आश्वासनं मोदी सरकारने पूर्ण न केल्याचा आरोप करत सदाशिव पाटील यांनी केंद्रसरकारचा यावेळी निषेध केला.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganeshotsav 2026 : गणरायाच्या आगमनाने महाराष्ट्र भक्तिमय, मुंबईपासून कोकणापर्यंत उत्साहाला उधाण

Maharashtra News Live Update: सांगलीमध्ये भीषण अपघात, कार वारणा नदीत कोसळली

konkan Fort : घोड्याच्या नालासारखा आकार असलेला किल्ला, रचना पाहून व्हाल थक्क!

Ladki Bahin Yojana: ४ दिवसांत लाडक्या बहि‍णींच्या खात्यात १५०० जमा होणार, ऑगस्टच्या हप्त्याची संभाव्य तारीख समोर

Crime: मार्केटमधून घराकडे निघालेल्या महिलेसोबत भयंकर घडलं, भररस्त्यात पोलिसाने छेड काढली नंतर...

SCROLL FOR NEXT