jayant patil  saam tv
मुंबई/पुणे

विरोधीपक्ष नेता राष्ट्रवादी काँग्रेसचा होणार; जयंत पाटील यांनी व्यक्त केला विश्वास

विधानसभेत अधिक सदस्य हे राष्ट्रवादीकडे राहिले आहेत. राष्ट्रवादीचा विरोधीपक्ष नेता होणार, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

रामनाथ दवणे साम टीव्ही मुंबई

मुंबई : शिवसेनेचे ३९ सदस्य हे शिंदे गटाला जाऊन मिळाल्याने सदस्य संख्या कमी झाली आहे. विधानसभेत अधिक सदस्य हे राष्ट्रवादीकडे राहिले आहेत. राष्ट्रवादीचा विरोधीपक्ष नेता होणार, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी व्यक्त केला. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. (Jayant Patil News In Marathi )

विधानसभेच्या दोनदिवसीय विशेष अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. या अधिवेशनात विश्वासदर्शक ठराव आणि विधानसभा अध्यक्षांची निवड झाली. अध्यक्षपदासाठी भाजपचे (BJP) राहुल नार्वेकर, तर शिवसेनेचे राजन साळवी यांच्यात लढत झाली. या लढतीत भाजपचे राहुल नार्वेकर १६४ मतांनी विजयी झाले. यानंतर जयंत पाटील यांनी विरोधीपक्ष नेतेपदावर भाष्य केलं. जयंत पाटील म्हणाले,' विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ३९ सदस्यांनी व्हिपच्या विरोधात मतदान केले आहे. त्यांचे सदस्यपद रद्द करण्याची प्रक्रिया सुरु होईल. विधानसभा उपाध्यक्ष यांनी जे पटलावर आणले ते मान्य केले जाईल'

'शिवसेनेचे ३९ सदस्य हे शिंदे गटाला जाऊन मिळाल्याने सदस्य संख्या कमी झाली आहे. आता अधिक सदस्य हे राष्ट्रवादीकडे राहिले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचा (NCP) विरोधीपक्ष नेता होणार आहे. आज शरद पवार यांनी बैठक बोलावली आहे. यामध्ये विरोधीपक्ष नेते पदाबाबत चर्चा होईल. अनुभवी विरोधीपक्ष नेता असावा असा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार घेतील. विरोधी पक्ष नेता आमचा असला तरीही महाविकास आघाडी सोबत आमचे काम असेल. राष्ट्रवादी पक्षाच्या विरोधी पक्षाच्या पदासाठी निवडी बाबत आज ७ वाजता बैठक होईल. शरद पवार योग्य तो विरोधी पक्ष नेता निवडतील', असेही जयंत पाटील यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT