ncp on eknath shinde news  saam tv
मुंबई/पुणे

'सत्तेच्या लालसापोटी बंड करणाऱ्यांनी...'; राष्ट्रवादीने साधला मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा

मुख्यमंत्र्यांच्या त्या वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) प्रवक्ते महेश तपासे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

साम टिव्ही ब्युरो

रश्मी पुराणिक

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे सातारा जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावी गेली असताना "बंड करताना थोडा जरी दगा फटका झाला असता, तरी शहीद होण्याचा धोका होता," असं खळबळजनक वक्तव्य केल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे . त्यांच्या या वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) प्रवक्ते महेश तपासे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. ( NCP Spokesperson Mahesh Tapase On CM Eknath Shinde)

तपासे म्हणाले, 'वास्तविक शहीद ही उपमा कोणाला देतात हे कदाचित मुख्यमंत्री महोदयांना माहीत नसावं. लष्करातील जवान जेव्हा देशाच्या रक्षणासाठी आपल्या प्राण्यांची आहुती देतात. देशाच्या दुश्मनांसमोर शरणागती न पत्करता सर्वोच्च बलिदान करतात अशांना शहीद म्हटलं जातं'.

'भारतीय स्वातंत्र्यलढ्यात ज्यांनी ब्रिटिश पोलिसांच्या लाठ्या काठ्या खाल्ल्या, तुरुंगवास भोगला व हसत हसत फाशीची शिक्षा स्वीकारली ते शहीद. देशात घुसखोरी केलेल्या दहशतवाद्यांना पिटाळून लावत असताना त्यांच्या प्रति हल्ल्यात झालेल्या गोळीबाराचा सामना करत असताना वीरगती प्राप्त झालेले आमचे पोलीस बांधव हे शहीद', असेही ते म्हणाले.

'परंतु सत्तेसाठी बंड करायचा व ज्या घराने आपल्याला आसरा दिला, नाव दिले, मोठे केले, अशाच घराला फोडणारे कधीच कोणाच्याही समोर आदर्श होऊ शकत नाही असा टोमणा महेश तपासे यांनी लगावला. त्यांचा बंड यशस्वी ठरो किंवा अपयशी ठरो, इतिहास त्यांना काय म्हणेल हे महाराष्ट्राला माहीतच आहे', असेही महेश तपासे पुढे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

5 Sweet Foods For Diabetes: डायबिटीजच्या रूग्णांसाठी ५ गोड पदार्थ फायदेशीर; रक्तातील साखर राहील नियंत्रणात

H1N1 flu symptoms: साधा ताप समजून दुर्लक्ष करताय? H1N1 ची ही गंभीर लक्षणं दिसल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या

Tingling In Feet : तुमच्या पायांना सतत मुंग्या येतात; 'या' गंभीर आजाराचे आहे लक्षण, असा कराल बचाव?

Maharashtra News Live Update: समृद्धी महामार्गावरील दरोडाच्या सूत्रधार बीडमधून जेरबंद

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेत मोठा घोटाळा? 14,298 पुरुषांना मिळाले ₹1,500; धक्कादायक माहिती उघड

SCROLL FOR NEXT