vidya chavan, nilesh rane, rajyasabha election, ajit pawar, navi mumbai news saam tv
मुंबई/पुणे

बापाच्या जीवावर माेठे झालेल्यांनी पवारांवर बाेलू नये; राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांचा राणेंना इशारा

आज नवी मुंबईत विद्या चव्हाण यांनी माजी खासदार निलेश राणेंचा माध्यमांशी बाेलताना समाचार घेतला.

साम न्यूज नेटवर्क

- सिद्धेश म्हात्रे

नवी मुंबई : काेण निलेश राणे ? आम्हांला माहिती नाही. अजित पवार हे रात्रंदिवस काम करतात. भाजपात (bjp) बरळणा-यांची संख्या माेठी झाली आहे. जे बापाच्या जीवावर माेठे झालेत ज्यांना स्वत:ची अक्कल नाही अशांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांच्यावर टीका करु नये असा टाेला राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या (ncp) प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण (vidya chavan) यांनी माजी खासदार निलेश राणेंना (nilesh rane) नवी मुंबईत (navi mumbai) लगावला. (nilesh rane latest marathi news)

राज्यसभा निवडणुकीनंतर (rajyasabha election) माजी खासदार निलेश राणे यांनी ट्विट (tweet) करीत अजित पवार आणि राेहित पवार यांना लक्ष केले. अडचणीचे ढग दिसले की अजित पवार मिस्टर इंडिया सारखे गायब होतात. इतिहास सांगतो जेव्हा असामान्य परिस्थिती निर्माण होते तेव्हा अजित पवार गुल. पण बरं झालं अजित पवार यात पडले नाही कारण पहाटेच्या शपथविधीला त्यांच्यासोबत त्यांच्याच पक्षातले आमदार राहिले नाही ते बाहेरून आमदार कुठून आणणार अशी उपमुख्यमंत्र्यांवर टीका केली हाेती.

त्यावर विद्या चव्हाण यांनी आज नवी मुंबईत निलेश राणेंवर सडकून टीका केली. त्या म्हणाल्या अजित पवार हे रात्रंदिवस जनतेसाठी झटत आहेत. त्यांच्या कामाची पद्धत महाराष्ट्र जाणते. जे बापाच्या जीवावर माेठे झालेत त्यांनी उपमुख्यमंत्र्यांबद्दल काहीही बाेलू नये. भाजपात ज्या बरळणा-या लाेकांना घेतले आहे. त्यात नारायण राणेंचे दाेन मुले अग्रेसर असल्याचा टाेला चव्हाण यांनी यावेळी हाणला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sara Ali Khan Skin Care: सारा अली खानची ही स्किन केअर रूटीन करा फॉलो, तुमचीही त्वचा करेल ग्लो

खुशखबर! पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना १५ हजार रूपये मिळणार; मोदी सरकारकडून योजनेत मोठा बदल

Pune Crime : सासरी येण्यास नकार दिल्याने वाद, पतीने पत्नीवर केला चाकूने हल्ला; गळ्यावर वार झाल्याने महिलेचा मृत्यू

Maharashtra Live News Update: नागपूरच्या बारमध्येच शासकीय काम; उपविभागीय अभियंत्याची चौकशी सुरू

भाषेवरून लोकसभेतच गदारोळ, निशिकांत दुबेंचा 'हिंदी' हट्ट, पाहा काय घडलं? |VIDEO

SCROLL FOR NEXT