Supriya Sule, Devendra Fadnsvis Saam Tv
मुंबई/पुणे

मंत्रिमंडळात महिलांना स्थान नाही; PM मोदींचे जुने ट्विट पोस्ट करत सुप्रिया सुळेंचा शिंदे-फडणवीसांवर नेम

शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळाचा विस्तार एक महिन्यानंतर झालाआहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: अखेर एक महिन्यानंतर शिंदे-फडणवीस (Eknath Shinde) मंत्रिमंडळाचा विस्तार आज झाला आहे. आज सकाळी शिंदे गटातील ९ तर भाजमधील ९ आमदारांनी शपथ घेतली. या मंत्रिमंडळात एकाही महिला आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतलेली नाही,यावरुन आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जुने ट्विट शेअर करत टीका केली आहे.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला. उशीरा का होईना राज्याला मंत्री मिळाले ही आनंदाची बाब आहे. मंत्रीपदाची शपथ घेतलेल्या सर्वांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा, असं ट्विट खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे, तर या ट्विट मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जुने ट्विट शेअर केले आहे.

'स्वतः पंतप्रधान मा. नरेंद्रीजी मोदी हे देशाच्या प्रगतीसाठी स्त्री-सक्षमीकरण आवश्यक असल्याचे सांगतात. त्यासाठी त्या केवळ 'होम मेकर' असू नयेत तर त्या 'नेशन बिल्डर' असाव्यात असं ते सांगतात. राज्याच्या स्त्री-शक्तीवर हा अन्याय आहे, असं खासदार सुप्रिया सुळे यांनी या ट्विट मध्ये म्हटले आहे.

शिंदे गटाकडून पहिल्या टप्प्यात गुलाबराव पाटील, संदिपान भूमरे, दीपक केसरकर, तानाजी सावंत, शंभुराजे देसाई, दादा भुसे, उदय सामंत, संजय राठोड, अब्दुल सत्तार हे आमदार शपथ घेणार आहेत. तर भाजपकडून पहिल्या टप्प्यात चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार, रवींद्र चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील, विजयकुमार गावित, सुरेश खाडे, अतुल सावे, मंगल प्रभात लोढा या आमदारांनी शपथ घेतली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी भाजपची मोर्चेबांधणी; प्रदेशाध्यक्ष बैठकांचा धडका

KDMC Hospital: प्लास्टरऐवजी रुग्णाच्या पायाला बांधला पुठ्ठा; केडीएमसी रुग्णालयाचा बेजबाबदार कारभार

चमोली बोकद्यामध्ये मोठी दुर्घटना; मातीचा ढिगारा आणि पाणी शिरलं, अनेक कामगार अडकले

शिवसेनेवरील सुनावणीत सुप्रीम कोर्टात काय घडलं? निवडणूक आयोगाला चूक भोवणार?

राहुल गांधीनी उडवली PM मोदींची खिल्ली; स्टेजवरील गळाभेटीच्या व्हिडिओची होतेय चर्चा, VIDEO

SCROLL FOR NEXT