Amol mitkari News
Amol mitkari News  saam tv
मुंबई/पुणे

'शिंदे गटाच्या नाकावर टिच्चून...'; मंत्रिमंडळ विस्तारानंतर मिटकरींनी लगावला राज्य सरकारला टोला

साम टिव्ही ब्युरो

रश्मी पुराणिक

मुंबई : एक महिन्यानंतर शिंदे-फडणवीस (Eknath Shinde) मंत्रिमंडळाचा विस्तार आज झाला आहे. आज सकाळी शिंदे गटातील ९ तर भाजमधील ९ आमदारांनी शपथ घेतली. राज्यात बंडाळीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विराजमान झाले, त्यानंतर ३८ दिवस मंत्रिमंडळ विस्तार रखडला होता. त्यानंतर आज सत्तास्थापनेनंतर ३९ दिवसांनी शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. या मंत्रिमंडळ विस्तारानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी ट्विट करत शिंदे सरकारला टोला लगावला आहे. (Amol Mitkari News)

जेष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्याने राज्यात महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. त्यानंतर एकनाथ शिंदे गटाच्या ४० आमदारांनी भाजपशी युती केली. त्यानंतर राज्यात शिंदे सरकार विराजमान झाले. या सरकारमध्ये एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रिपद तर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्रिपदावर विराजमान झाले. त्यानंतर दोन्ही नेत्यांच्या या राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी दिल्लीच्या वाऱ्या वाढल्या. तब्बल एक महिन्याहून अधिक काळ लोटला तरी विस्तार झाला नव्हता. त्यामुळे विरोधकांनी शिंदे सरकारवर जोरदार टीका केली. त्यानंतर आता ३९ दिवसांनी शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे. या मंत्रिमंडळ विस्तारावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी शिंदे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

'अर्थ व गृह खात्यावर गेल्या अनेक दिवसांपासून द्वंद्व युद्ध सुरू असताना, शिंदे गटाच्या नाकावर टिच्चून दोन्हीं महत्वाची खाते स्वतःकडे ठेवून शिंदे गटावर निर्विवाद वर्चस्व सिद्ध केल्याबद्दल अभिनंदन.आपल्या अधिपत्याखाली हे सरकार चालेल यात शिंदे गटाला अजिबात शंका नाही', अशा शब्दात अमोल मिटकरी यांनी ट्विट करत शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: प्रणितीसह सुशीलकुमार शिंदे भाजपच्या वाटेवर? प्रकाश आंबेडकरांच्या दाव्याने खळबळ

MI vs KKR, IPL 2024: मुंबईचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात! घरच्या मैदानावर मुंबईचा KKR कडून लाजिरवाणा पराभव

Maharashtra Politics 2024 : पवारांनी गल्ली ते दिल्लीपर्यंत फोडला घाम; पश्चिम महाराष्ट्रात अस्तित्वासाठी संघर्ष

Baramati Politics: विधानसभेतही बारामतीत महाभारत, अजित पवार यांना पुतण्या युगेंद्र देणार आव्हान?

Hardik Pandya Troll: हार्दिकने रोहितलाच केलं प्लेइंग ११ मधून बाहेर! फॅन्सच्या संतप्त प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT