सुनेत्रा पवार  Saam Tv
मुंबई/पुणे

Sunetra Pawar : सुनेत्रा वहिनींनी मुख्यमंत्रिपदी विराजमान व्हावं, आई एकविरा चरणी राष्ट्रवादीच्या आमदाराचं साकडं

Maharashtra politics update : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी आई एकविरा देवीच्या चरणी सुनेत्रा पवार मुख्यमंत्री व्हाव्यात अशी प्रार्थना केली आहे. या वक्तव्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे.

Namdeo Kumbhar

दिलीप कांबळे, मावळ प्रतिनिधी

Sunetra Pawar chief minister demand NCP MLA statement : "मला मंत्रीपद मिळो की न मिळो, पण दादांना मुख्यमंत्रीपद मिळायला हवे होते. ही एक इच्छा अपूर्ण राहिली आहे. आता अजित दादा राहिले नाहीत, तरी त्यांच्या रूपात सुनेत्रा वहिनी मुख्यमंत्री व्हाव्यात, अशी आई एकविरा चरणी प्रार्थना आहे. आम्ही त्यांना घेऊन पुन्हा एकविरा देवीच्या दर्शनाला येऊ," असे साकडे आई एकविरा देवीला मावळचे आमदार सुनील शेळके यांनी घातले आहे.

सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद, पंचायत समिती, लोणावळा, वडगाव आणि तळेगाव या सर्व ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवण्यात आला. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नवनिर्वाचित नगराध्यक्ष, नगरसेवक, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांनी आज कार्ला गडावरील आई एकविरा देवीचे दर्शन घेतले. त्यावेळी आमदार सुनील शेळके यांनी आई एकविरा देवीच्या चरणी नतमस्तक होत साकडं घातलं.

दरम्यान, श्री एकविरा देवी देवस्थान ट्रस्टच्या वतीने सर्व प्रतिनिधींचा विशेष सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यापूर्वी राज्यात शिवसेनेची सत्ता स्थापन झाल्यानंतर, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली याच कार्ला गडावर प्रथमच नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार करण्यात आला होता. त्यानंतर मावळच्या इतिहासात दुसऱ्यांदा एवढ्या मोठ्या संख्येने लोकप्रतिनिधी एकत्र येऊन देवीचे दर्शन घेताना पाहायला मिळाले.

चैत्र यात्रेनंतरही कार्ला गडावर भाविकांची मोठी गर्दी कायम आहे. आमदार सुनील शेळके यांच्या नेतृत्वाखाली तालुक्याच्या विकासाला गती देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. तसेच गड परिसरातील सुरू असलेल्या विकासकामांची पाहणी करून पुढील नियोजनावरही चर्चा करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

विधान परिषदेच्या निवडणुकीआधी शिवसेनेत मोठी उलथापालथ; एकनाथ शिंदे पक्षात भाकरी फिरवणार

Shocking : दोन महिन्यांच्या मुलीला आईच्या कुशीतून पळवलं, पालकांना शेतात सापडला मृतदे; नेमकं काय घडलं?

मुंबईत BCCIच्या ब्रॉडकास्ट इंजिनिअरचा संशयास्पद मृत्यू; IPLसाठी आला होता भारतात|VIDEO

8th Pay Commission: २०२६ की २०२७; कधी होणार आठवा वेतन आयोग लागू? केंद्र सरकारने स्पष्टच सांगितलं

Maharashtra Live News Update: छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑटो एलपीजी पंपासमोर ३ ते ४ किलोमीटरच्या रांगा

SCROLL FOR NEXT