Rohit Pawar News saam tv
मुंबई/पुणे

Rohit Pawar News:...तर उद्या अन्नाचा एक कणही घेणार नाही; मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ रोहित पवारांकडून १ दिवस अन्नत्याग

Rohit Pawar News: राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी गुरुवारी एक दिवस अन्नत्याग करण्याचा निर्णय घेतला आहे.

Vishal Gangurde

Rohit Pawar News:

मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषणाची घोषणा केली आहे. मनोज जरांगे यांच्या भूमिकेमुळे आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. यामुळे मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दरबारी गेल्याची चर्चा आहे. याचदरम्यान, मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी गुरुवारी एक दिवस अन्नत्याग करण्याचा निर्णय घेतला आहे. सणसवाडीतील जाहीर सभेत रोहित पवार यांनी अन्नत्याग करण्याचा निर्णय जाहीर केला. (Latest Marathi News)

आमदार रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेला सुरुवात झाली आहे. या यात्रेसाठी रोहित पवार हे पुणे ते नागपूर असा प्रवास करणार आहेत. दसऱ्याच्या दिवसापासून त्यांनी या संघर्ष यात्रेला सुरुवात केली. या यात्रेच्या माध्यमातून रोहित पवार जनतेशी संवाद साधणार आहेत. सध्या रोहित पवार यांची यात्रा शिरुर तालुक्यात आहे. या यात्रेतील सभेत रोहित पवारांनी मराठा आरक्षणावर मोठं भाष्य केलं. (सामच्या बातम्या Whatsapp वर मिळवण्यासाठी आत्ताच या लिंकवर क्लिक करा)

आमदार रोहित पवार म्हणाले, मनोज जरांगे पुन्हा उपोषणाला बसत आहेत. संघर्ष यात्रा युवकांच्या हिताची आहे. युवकांना काम मिळालं पाहिजे. युवकांचे शिक्षणाचे प्रश्न सुटले पाहिजे. शिक्षण आज महाग होत आहे. तरुणांना नोकऱ्या मिळत नाहीये. अशा परिस्थितीच एक सामाजिक कार्यकर्ता लढत असेल तर मी या ठिकाणी जाहीर करतो, सरकारने या ठिकाणी पुढाकार घ्यावा. आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडावी लागेलच'.

'ईडब्लूएस कोट्यासाठी घटनादुरुस्ती करु शकत असाल. मग मराठा समाज असेल, धनगर समाज असेल यांच्यासाठी आरक्षणाची मर्यादा का ओलांडू शकत नाही? ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडून १६ टक्के अधिकचं आरक्षण मराठा समाजाला का देऊ शकत नाही? असा प्रश्न रोहित पवारांनी उपस्थित केला.

'मराठा आरक्षण कोर्टात टिकलं पाहिजे. असं आरक्षण आपण दिलं पाहिजे. यासाठी एक कार्यकर्ता उपोषणाला बसत असेल तर या ठिकाणी जाहीर करतो की, उद्या दिवसभर अन्नत्याग करणार आहे. उद्या शिरूर तालुक्यातून 20 किलोमीटरचा प्रवास करणार आहे. हा प्रवास करत असताना अन्नाचा एक कणही घेणार नाही, असे रोहित पवार म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे जिल्हा सत्र न्यायालयात आज नसरापूर प्रकरणाचा निकाल

Gold Rate Today : सोने चांदीचे दर घसरले! तब्बल २७,००० रुपयांनी सोनं स्वस्त; चांदीचा भाव काय? जाणून घ्या ताजे दर

High blood pressure: तरुण वयातच वाढतोय रक्तदाब? डॉक्टरांनी सांगितलं रोजच्या सवयींमधील सर्वात मोठं कारण

पहिला पाऊस पडल्यानंतर शेतकरी आनंदी का होतो? |why farmers are happy after rain

नादाला लागू नका, मी ५ लोकांना ठार केले; संजय पाटलांची उघड धमकी? ठाकरेंच्या खासदाराच्या आरोपाने उडाली खळबळ

SCROLL FOR NEXT