Rohit pawar News  Saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : देवेंद्र फडणवीस यांच्या 'त्या' विधानावरून रोहित पवारांचा जोरदार घणाघात; म्हणाले...

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानाला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

रोहिदास गाडगे

Rohit Pawar News : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानाला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बदला घेण्याच्या त्या विधानावर रोहित पवार यांनी लक्ष वेधल. त्यावरून शिंदे-फडणवीस सरकार लोक हितासाठी नाही, तर बदला घेण्यासाठी आल्याचा घणाघाती आरोप रोहित पवारांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर देताना केला. तसेच येत्या 2024 ला महाराष्ट्रात बदल होणार असल्याचे स्पष्ट संकेत रोहित पवारांनी दिले .

रोहित पवार खेड तालुक्यातील जनजीवन मिशन पाणी योजनेच्या कार्यक्रमात चाकण येथे बोलत होते. त्यावेळी रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर हल्लाबोल केला. आपलं कुटुंब आणि महाराष्ट्रावर कोण बोलत असेल तर आपण शांत का बसायचे असा सवाल उपस्थित करत रोहित पवारांनी हल्लाबोल केला.

'छत्रपती शिवाजी महाराज,महापुरुष,संतांवर आक्षेपार्ह विधान केल्याची आठवण करुन देत भाजपा आणि शिंदे गटातील नेत्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याची खंत व्यक्त केली. तसा सत्ता स्वत:च्या हितासाठी आणि 40 आमदारांना खूश करण्यासाठी हवी होती, असा घणाघात आरोपही रोहित पवारांनी (Rohit Pawar) केला.

चिंचवड पोटनिवडणुकीवर रोहित पवार यांनी भाष्य केलं. चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत तिरंगी लढत होत असताना जगतापांच्या विरोधात रोष नाही. मात्र भाजपाच्या विरोधात रोष असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस विजय सहज होईल, असा आशावाद व्यक्त करत अश्विनी जगताप यांच्याबाबत रोहित पवारांनी सहानुभूती व्यक्त केली.

चिंचवड पोटनिवडणूकीच्या रिंगणात शिवसेनच्या राहुल कलाटेंनी बंडखोरी करत मोठं आव्हान उभं केलं असताना शिवसेना चिंचवडमध्ये बंडखोरी करत नाही. तर त्यांच्या एक नेत्याची बंडखोरी असल्याचे रोहित पवारांनी स्पष्ट केले. या निवडणुकीत जगतापांच्या विरोधात रोष नसून भाजपाच्या विरोधात रोष आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉग्रेसचा विजय निश्चित असल्याचे रोहित पवारांनी संकेत दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

Pitru Paksha : पितरांना प्रसन्न करण्यासाठी बनवा तांदळाची खीर, श्राद्धाच्या नैवेद्यासाठी अगदी सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT