Rohit Pawar News saam tv
मुंबई/पुणे

Rahit Pawar News : रोहित पवारांची आज पुन्हा ईडी चौकशी; राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमक, पंढरपुरात विठ्ठल मंदिरासमोर महाआरती

Rahit Pawar ED Inquiry : रोहित पवारांच्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर प्रदेश कार्यालयाबाहेर मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली आहे. त्यामध्ये महाविकास आघाडीच्या तिन्ही घटक पक्षांतर्फे रोहित पवारांना पाठिंबा देण्यात आला आहे.

प्रविण वाकचौरे

सचिन गाड

Mumbai News :

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची आज पुन्हा एकदा ईडी चौकशी होणार आहे. ईडी चौकशीविरोधात शरद पवार गट चांगलाच आक्रमक झाला आहे. चौकशीचा निषेध म्हणून आज प्रदेश कार्यालयाबाहेर राष्ट्रवादीचे नेते तसेच पदाधिकारी उपोषण करणार आहेत. तर उर्वरित महाराष्ट्रात राष्ट्रवादी जिल्हाधिकारी तसेच तहसीलदार कार्यालयांबाहेर घंटानाद आंदोलन करणार आहे.

रोहित पवारांच्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर प्रदेश कार्यालयाबाहेर मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली आहे. त्यामध्ये महाविकास आघाडीच्या तिन्ही घटक पक्षांतर्फे 'वारसा विचारांचा, मार्ग संघर्षाचा', लडेंगे और जितेंगे अशा आशयाचे बॅनर लावत रोहित पवारांना बळ देण्यात येत आहे.

पंढरपुरात विठ्ठल मंदिरासमोर महाआरती

ईडी चौकशीचा निषेध म्हणून राज्यभरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केले आहे. आज सकाळी पंढरपुरात देखील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी रोहित पवार यांच्या समर्थनार्थ विठ्ठल मंदिरासमोर संत नामदेव पायरीजवळ महाआरती केली. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आमदार रोहित पवार यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. तर भाजप सरकारचा निषेध केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sushil Kedia : ठाकरेंची माफी मागितल्यावर केडियाची आणखी एक पोस्ट, थेट अमित शहा यांचेच नाव घेतलं

Varai Khichdi Upvas : उपवासाला साबुदाणे कशाला? झटपट करा वरईची खिचडी, नोट करा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी अजित पवारांची निवड

Thackeray Brothers Reunion: ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने विरोधकांची पायाखालची वाळू सरकली – शिवसैनिकांची प्रतिक्रिया|VIDEO

Actress Father shot: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर भरदिवसा गोळीबार; नेमकं काय घटलं? वाचा घटनाक्रम

SCROLL FOR NEXT