Rohit Pawar News saam tv
मुंबई/पुणे

Rohit Pawar News: मराठी माणसं कधी पळून जात नाहीत; ईडी चौकशी आधी रोहित पवारांचं मोठं विधान

Rohit Pawar Latest News: राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना बारामती अॅग्रो कंपनी प्रकरणात ईडीने चौकशीसाठी बोलावलं आहे. त्यामुळे रोहित पवार उद्या बुधवारी ईडी कार्यालयात दाखल होणार आहेत.

Vishal Gangurde

रुपाली बडवे, मुंबई

Rohit Pawar News:

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना बारामती अॅग्रो कंपनी प्रकरणात ईडीने चौकशीसाठी बोलावलं आहे. त्यामुळे रोहित पवार उद्या बुधवारी ईडी कार्यालयात दाखल होणार आहेत. या ईडी चौकशीआधी रोहित पवारांनी मोठं विधान केलं आहे. 'मराठी माणस कधी शांत बसत नाहीत, मराठी माणसं कधी पळून जात नाहीत, असं विधान रोहित पवारांनी केलं आहे. (Latest Marathi News)

रोहित पवारांनी मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. रोहित पवार म्हणाले, 'उद्या शरद पवार, सुप्रिया सुळे राष्ट्रवादी कार्यालयात असतील. कार्यकर्त्यांना विनंती आहे की, उद्या गर्दी करू नये. ईडीची कारवाई सुरु झाली म्हणजे इलेक्शन जवळ आलं आहे. महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँक आणि माझ्या कारखान्यासंदर्भातील केस थोडी सुरक्षित आहे'. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

'या केसमध्ये माझं नाव आहे. मी चूक केलेली नाही. मी माझ्या बाजूने लढेल. यातून मी बाहेर पडेल. मी एकटा नाही. पण या सर्वांना यातून बाहेर काढेन. ईडीचे अधिकारी त्यांचं काम करत आहेत. राजकीय द्वेषातून कारवाई करण्याचा प्रयत्न केला असेल तर सर्वांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करेल', असं रोहित पवार म्हणाले. (Rohit Pawar Latest news)

मराठी माणसं शांत बसत नाहीत : रोहित पवार

'लोकशाही आणि कोणाचा आवाज दाबण्याचा यंत्रणेचा वापर केला जात असेल तर, मराठी माणसं कधी शांत बसणारे नाहीत. मराठी माणसं कधीही पळून जात नाहीत. मी लढत राहणार आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांना मी पूर्णपणे सहकार्य करेल. मुंबईत उद्या कोणी गर्दी करू नये. उद्या 24 तारखेला मी ईडी कार्यालयात जाणार आहे, असे ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

किचनमध्ये रोज होणाऱ्या ७ चुका, ज्या प्रत्येक महिलेने आवर्जून टाळाव्यात; आरोग्यावर होतात गंभीर परिणाम

Maharashtra News Live Update: येवल्याच्या वाईबोथीमध्ये घातक स्फोटक साठा जप्त, तिघांविरोधात गुन्हा

Using Phone Before Sleep: बेडवर जाण्याआधी फोन वापरणं टाळा, ही वाईट सवय मोडण्यासाठी ९ कारणं माहीत असायलाच हवीत

Lucky Mobile Number : मोबाईल नंबर तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या शेवटच्या Lucky अंकाचा खेळ

Mumbai Toll: मुंबईकरांचा प्रवास महागला, टोलच्या दरात मोठी वाढ; नवे दर किती?

SCROLL FOR NEXT