Rohit Pawar News  Saam Tv
मुंबई/पुणे

Rohit Pawar : 'बाबाची बडबड मध्यप्रदेशात खपेल, पण...'; धीरेंद्र शास्त्रींच्या वादग्रस्त वक्तव्यावरून रोहित पवार भडकले

धीरेंद्र महाराज शास्त्री यांनी संत तुकाराम महाराजांवर वादग्रस्त वक्तव्य केल्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

Rohit pawar News : धीरेंद्र महाराज शास्त्री यांनी संत तुकाराम महाराजांवर वादग्रस्त वक्तव्य केल्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे. धीरेंद्र महाराज शास्त्री यांच्यावर चहुबाजूंनी टीका केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी धीरेंद्र महाराज शास्त्री यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

'बाबाची बडबड एकवेळ मध्यप्रदेशात खपेल पण भक्ती-प्रेमाची शिकवण देणाऱ्या संतांबाबत आणि वारकरी संप्रदायाबद्दल बोललेलं महाराष्ट्र कदापि खपवून घेणार नाही, असा इशारा रोहित पवार यांनी दिला आहे. (Latest Marathi News)

बागेश्वर धामचे बागेश्वर बाबा उर्फ धीरेंद्र महाराज शास्त्री आपल्या दरबारात अनेक चमत्कार करत असल्याच्या बातम्या समोर येत असतात. त्यांनी त्यांच्या प्रवचनामध्ये संत तुकाराम महाराजांवर वादग्रस्त वक्तव्य केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. या वक्तव्यावरुन ते वादात सापडले आहेत. त्यांच्या या वक्तव्यामुळे अनेकांनी माफीची मागणी केली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार रोहित पवार यांनी देखील ट्विट करत धीरेंद्र महाराज शास्त्री यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले, 'बागेश्वर बाबाने जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकोबारांयांबद्दल गरळ ओकली असताना राज्याचं पालकत्व ज्यांच्याकडं आहे ते मात्र शांत आहेत.. या बाबाची बडबड एकवेळ मध्यप्रदेशात खपेल पण भक्ती-प्रेमाची शिकवण देणाऱ्या संतांबाबत आणि वारकरी संप्रदायाबद्दल बोललेलं महाराष्ट्र कदापि खपवून घेणार नाही. अशा माणसाला सरकारने तुकोबारायांच्याच शब्दांत उत्तर द्यावं. तुका म्हणे ऐशा नरा, मोजूनी माराव्या पैजरा'.

दरम्यान, संभाजी, ब्रिगेडचे संतोष शिंदे यांनीही धीरेंद्र महाराज शास्त्री यांच्यावर जोरदार टीका केली आहे. संतोष शिंदे म्हणाले, 'जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे बदनामी करणाऱ्या बागेश्वर धाम नावाचा भोंदू बाबा तुम्ही पहिली शिंदेशाही पगडी काढा तुझी पात्रता नाही शिंदेशाही, होळकरशाही पगडी घालायची. ही स्वराज्याच्या मावळ्याची पगडी आहे'.

'शिंदेशाही, होळकर शाही'ची पगडी घालून चमत्कार करणाऱ्याला, जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची बदनामी करणाऱ्याला संभाजी ब्रिगेड सोडणार नाही. वारकरी, स्वयंघोषित पक्षाच्या अध्यात्मिक आघाड्या झोपल्या की काय...? असा सवाल संतोष शिंदे यांनी केला आहे.

काय म्हणाले बागेश्वर बाबा?

संत तुकाराम महाराजांबद्दल बोलताना बागेश्वर बाबाने "त्यांची बायको त्यांना रोज मारायची, त्यामुळे ते देव देव करायला लागले," असे विधान केले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर जोरदार टीका होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बड्या पोलीस अधिकाऱ्याचे निधन, महाराष्ट्र पोलीस दलात शोककळा

Suryakumar Yadav: सूर्यकुमारला डबल धक्का; BCCI नंतर मुंबई इंडिन्यसही साथ सोडणार?

Maharashtra News Live Update: सातारा महामार्गावर एसटी बसचा अपघात

सुनेत्रा पवारांनी छगन भुजबळांना खासदारकी का दिली नाही? समोर आले 'हे' मोठे कारण, वाचा इनसाईड स्टोरी

Gautami Patil-Bhau Kadam : 'हिल हिल पोरी हिला...'; गौतमी पाटील अन् भाऊ कदम यांच्या केमिस्ट्रीची जादू, पाहा Unseen Photo

SCROLL FOR NEXT