Ajit Pawar Death Saam Tv
मुंबई/पुणे

Ajit Pawar Death : राजीव गांधींची हत्या झाली तशीच अजित पवारांची झाली का? राष्ट्रवादीच्या आमदाराचे ८ सवाल

Ajit Pawar plane crash conspiracy claims : अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केल्याने महाराष्ट्रात राजकीय खळबळ उडाली आहे. अपघात, पायलट आणि चौकशी प्रक्रियेबाबत नव्या शंका व्यक्त होत आहेत.

Namdeo Kumbhar

अक्षय गवळी, अकोला प्रतिनिधी

अजित पवारांच्या विमान अपघातावेळी आलेला पायलट सुमित कपूर हा सुसाईड बॉम्बर म्हणून आला होता का?, असा गंभीर सवाल राष्ट्रवादीचे आमदार म्हणून मिटकरी यांनी केलाय. 'लिट्टे'ने माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या केली तशीच अजित पवार यांची हत्या झालीय का?, असा गंभीर सवालही त्यांनी यावेळी केलाय. अमोल मिटकरी यांच्या सवालानंतर राज्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

सुमित कपूर यांची पत्नी सुमित कपूर जिवंत असल्याच्या म्हणत असेल तर विमान अपघातात खरंच सुमित कपूरचा मृत्यू झाला का?, असा प्रश्न आमदार अमोल मिटकरी यांनी केलाय. ते अकोल्यातील एका आयोजित शिवजयंती कार्यक्रमात बोलत होते. अजित पवारांच्या विमान अपघाताबद्दल मोठं गुढ असताना महाराष्ट्र इतका शांत कसा?, असा सवालही त्यांनी केलाय.‌ अजित पवार हे महाराष्ट्राला न मिळालेले शिव विचारांचे सर्वोत्तम मुख्यमंत्री होते, असंही ते म्हणाले.

दरम्यान, अजित पवारांच्या विमानाचे आधीचे पायलट म्हणून जबाबदारी असलेले कॅप्टन साहिल मदन आणि कॅप्टन यश हे कोणत्या ट्रॅफिकमध्ये अडकले होतेय? त्याचे सीसीटीव्ही फुटेज कुठे आहेत? असा सवालही त्यांनी केलाय.‌ अजित पवारांचा मृत्यू म्हणजे गोजूबावीच्या माळरानावरचं न उलगडलेलं गुढ असल्याचं ते म्हणाले. 'ब्लॅक बॉक्स'चा डाटा आणखी काही दिवस देऊ नका. मात्र, सीसीटीव्ही फुटेज का देत नाही? असा सवालही त्यांनी केलाय.

अमोल मिटकरी यांनी उपस्थित केलेले सवाल?

  1. लिट्टेने राजीव गांधींची जशी हत्या केली तशीच हत्या अजित पवारांची झाली आहे का?.‌

  2. कॅप्टन सुमित कपूर हा सुसाईड बॉम्बर म्हणून आला होता का?

  3. जर कपूर यांची पत्नी सुमित कपूर जिवंत असल्याच्या म्हणत असेल तर विमान अपघातात खरंच सुमित कपूरचा मृत्यू झाला का?

  4. अजित पवारांच्या विमान अपघाताबद्दल मोठं गुढ असतांना महाराष्ट्र इतका शांत कसा?

  5. अजित पवारांच्या विमानाचे आधीचे पायलट म्हणून जबाबदारी असलेले कॅप्टन साहिल मदन आणि कॅप्टन यश हे कोणत्या ट्रॅफिकमध्ये अडकले होतेय?. त्याचे सीसीटीव्ही फुटेज कुठे आहेत?

  6. कॅप्टन साहिल मदन आणि कॅप्टन यश हे दोघे आता नेमके कुठे आहेत?.

  7. अजित पवारांचा मृत्यू म्हणजे गोजूबावीच्या माळरानावरचं न उलगडलेलं गुढ.

  8. 'ब्लॅक बॉक्स'चा डाटा आणखी काही दिवस देऊ नका.. मात्र, सीसीटीव्ही फुटेज का देत नाही?.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: ...तर सरकारचा माज उतरवलाच पाहिजे; मनोज जरांगे पाटील कडाडले

Uddhav Thackeray: राजीनाम्यानं चालणार नाही, तर सरकार बदला; जंतर मंतरवरून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

कार अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू; दुचाकीस्वाराला वाचवताना अनर्थ घडला!

राहुल-प्रियंका गांधींना 3 तासांनी पोलिसांनी सोडलं; सुटकेनंतरचा पहिला व्हिडिओ

Fact Check: देशातल्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनवर दगडफेक? CJP समर्थकांकडून हायड्रोजन ट्रेन टार्गेट?

SCROLL FOR NEXT