NCP MLA Sunil Shelke faces allegations of assault saam tv
मुंबई/पुणे

'बॅग हिसकावली, कागदपत्रे गायब केली'; राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळकेंवर मारहाणीचा आरोप, राजकारणात खळबळ

MLA Sunil Shelke: आमदार सुनील शेळके यांच्यावर मारहाणीचे आरोप करण्यात येत आहे. एका आरटीआय कार्यकर्त्यानं हे गंभीर आरोप केलेत. त्यामुळे मावळच्या राजकारणात खळबळ उडालीय.

Bharat Jadhav

  • मावळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांच्याविरोधात गंभीर आरोप

  • आरटीआय कार्यकर्ते सुनील गुजर यांनी मारहाण केल्याचा आरोप केला.

  • सरोदे यांनी आमदार शेळके यांच्याविरोधात ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी

सागर आव्हाड, साम प्रतिनिधी

अजित पवार गटाचे मावळमधील आमदार सुनील शेळके यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. स्थानिक पातळीवर भाजप कार्यकर्त्यांनी त्यांच्याविरोधात पेटलंय. आता आमदार शेळकेंवर थेट मारहाणीचा आरोप केला जातोय. आरटीआय कार्यकर्ता असलेले सुनील गुजर यांनी पत्रकार परिषदेत घेत आरोप केलाय.

आमदार सुनील शेळके माझा सतीश शेट्टी करतील माझ्या जीवाला धोका आहे, असा आरोप आरटीआय कार्यकर्ता सुनील गुजर यांनी केलाय. तर आमदार सुनील शेळके यांच्यावर ॲट्रॉसिटी दाखल करावी, अशी मागणी सरोदे यांनी केलीय. यासंदर्भात ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेणार आहेत. राज्यात महिला सुरक्षित नाहीत आमदारांकडून महिलांना धमक्या देऊन जातीवाचक शिवीगाळ होत असेल तर महिलांनी न्याय कुणाकडे मागायचा असा प्रश्न सरोदे यांनी केला.

आमदार शेळके यांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आरटीआय कार्यकर्ते सुनील गुजर यांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आलाय. शुक्रवारी घडलेल्या या कथित घटनेनंतर दोन्ही बाजूंनी परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत. या प्रकरणी सुनील गुजर यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली असून, मारहाणीमागे मावळ तालुक्यातील आंबळे गावातील गौणखनिज उत्खनन आणि जमिनीच्या व्यवहारा संदर्भातील प्रकरण असल्याचा दावा केलाय.

सुनील गुजर यांच्या आरोपानुसार, आमदार सुनील शेळके आणि त्यांच्या सोबत असलेल्या व्यक्तींनी त्यांना मारहाण केली आणि शिवीगाळ केली. तसेच, त्यांच्या हातातील बॅग हिसकावून त्यातील महत्त्वाची कागदपत्रे गायब करण्यात आल्याचा आरोपही गुजर यांनी केला आहे. मात्र, या आरोपांची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही.

आंबळे गावातील उत्खनन प्रकरण केंद्रस्थानी

मावळ तालुक्यातील आंबळे गावात गौणखनिजाचे बेकायदा उत्खनन करून शासनाचा लाखो रुपयांचा रॉयल्टी महसूल बुडवण्यात आल्याचा आरोप गुजर यांनी केला आहे. उत्खनन झालेल्या जमिनीचा एमआयडीसीला वापरासाठी देण्याच्या प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचा आणि त्यातून चांगले भूखंड मिळवून घेतल्याचा दावाही त्यांनी केला. या कथित गैरप्रकाराची माहिती उघड करण्याचा प्रयत्न करत असल्यामुळेच आपल्याला मारहाण करण्यात आल्याचा आरोप गुजर यांनी केला आहे.

महिलेलाही जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप

या कथित घटनेच्या वेळी करुणा सरोदे उपस्थित होत्या. त्यांनाही जातीवाचक शिवीगाळ करण्यात आल्याचा आरोप संबंधित महिलेने केला आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता मारहाण, कागदपत्रे गायब केल्याचा दावा आणि जातीवाचक शिवीगाळ अशा विविध आरोपांची किनार लाभली आहे.दरम्यान, या प्रकरणात दोन्ही गटांकडून परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्याने प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे.

आरटीआय कार्यकर्त्याने केलेल्या आरोपांची चौकशी करून आंबळे गावातील कथित गौणखनिज उत्खनन, रॉयल्टी महसूल आणि जमिनीच्या व्यवहारासंदर्भातील बाबींची सत्यता तपासण्याची मागणी होण्याची शक्यता आहे. आमदार सुनील शेळके यांची या आरोपांवरील अधिकृत बाजू आणि पोलिसांच्या तपासातील निष्कर्ष समोर आल्यानंतरच प्रकरणातील वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT