Sharad Pawar  Saam Tv
मुंबई/पुणे

Sharad Pawar On Barsu Project: 'स्थानिक लोकांना विश्वासात घ्या, विरोध असेल तर...', शरद पवारांनी दिला उद्योगमंत्र्यांना सल्ला

Latest News: 'स्थानिकांच्या विरोधाची कारणं लक्षात घेऊन मार्ग काढा.' असा सल्ला शरद पवारांनी दिला.

Priya More

Mumbai News: बारसू रिफायनरी प्रकल्पाबाबत (Barsu Refinery Project) राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांची (Sharad Pawar) भेट घेतली. या भेटीदरम्यान 'स्थानिक लोकांना विश्वासात घेणं गरजेचं आहे. स्थानिकांचा विरोध असेल तर ते समजून घ्या. त्यांच्या विरोधाची कारणं लक्षात घेऊन मार्ग काढा.' असा सल्ला शरद पवारांनी दिला.

उद्योगमंत्र्यांच्या भेटीनंतर शरद पवारांनी पत्रकरांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितले की, 'उद्योगमंत्र्यांसोबत चर्चा झाली. त्यांनी दोन गोष्टी सांगितल्या की पोलिस दलाचा वापर करुन काल जी कारवाई केली ती आता थांबवली आहे. बारसूमध्ये आता फक्त जमिनीची तपासणी केली जात आहे. मातीच्या परिक्षणाचे काम सुरु आहे. आता लोकांचा विरोध नाही. लोकांना समजावून सांगितले आहे.'

शरद पवारांनी पुढे सांगितले की, 'मी सामंतांना सांगितले असं घाई घाईने काही करु नका. विरोधक आणि शासकीय अधिकाऱ्यांची बैठक घ्या. त्यातून काय निष्पन्न होतय ते पाहूया. आणखी काही प्रश्न असतील तर मार्ग कसा निघेल हे बघता येईल. स्थानिक लोकांची नाराजी असेल तर त्यांचे प्रश्न समजून घेतले पाहिजे. जर विरोध असेल तर दुसरी काही जागा असेल तर त्याचा विचार व्हावा'

तसंच, 'मी स्थानिकांशी बोललो नाही त्यामुळे मला जास्त काही माहिती नाही. पण काही प्रश्न असतील तर ते सोडवले पाहिजे. स्थानिक लोकांना विश्वासात घेणं गरजेचं आहे. त्यांचा विरोध असेल तर विरोध का आहे हे समजू घेणे गरजेचे आहे. विरोधाची कारणं लक्षात घेऊन मार्ग काढा. स्थानिकांच्या भावना तीव्र असतील तर नोंद घेतली पाहिजे.', असं शरद पवारांनी यावेळी सांगितले.

'कोकणात काय नवीन होत असेल आणि त्याला स्थानिक विरोध असेल तर सरकारने त्याची नोंद घेतली पाहिजे. उद्या उदय सामंत स्थानिकांना भेटणार आहेत. उद्याच्या बैठकीत काय होतेय ते बघूया. या बैठकीत तोडगा निघतोय का ते पाहूया. तोडगा निघाला तर सर्वपक्षीयांमध्ये चर्चा हवी. चर्चेतून मार्ग काढा असा सल्ला मी त्यांना दिला आहे.', असे देखील शरद पवार यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT