Ajit Pawar And Chandrakant Patil  Saam Tv
मुंबई/पुणे

Ajit Pawar : 'कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणालाही दिला नाही; चंद्रकांत पाटलांवरील शाईफेकीचा अजित पवारांनी केला निषेध

भाजप नेते, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर झालेल्या शाईफेकीचा राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी निषेध केला आहे.

साम टिव्ही ब्युरो

सचिन जाधव

Ajit Pawar News : भाजप नेते, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर झालेल्या शाईफेकीचा राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी निषेध केला आहे. 'असले प्रकार कोणीही करता कामा नये. राजकीय किंवा इतर क्षेत्रातील व्यक्ती कोणी काही बोलले असेल तर कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणालाही दिला नाही. ज्यांनी कोणी हे कृत्य केलं, त्याचा निषेध करतो, अशा शब्दात अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांच्या शाईहल्ल्यावर प्रतिक्रिया दिली. (Latest Marathi News)

विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रसार माध्यामांशी संवाद साधला. त्यावेळी अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांच्या शाईहल्ल्याचा निषेध केला. अजित पवार पुढे म्हणाले, 'चंद्रकांत पाटील यांनी केलेलं वक्तव्य चुकीचं होतं. आम्ही त्याचं समर्थन कोणीही केलं नाही. आम्ही त्यांच्या वक्तव्याचा विरोध केला आहे'

'कायदा हातात कोणी घेऊन नये. ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाही. हे करणं अतिशय अयोग्य आहे की त्याचाही निषेध व्यक्त करतो, असेही अजित पवार म्हणाले.

विरोधक चाल असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांवर केला. त्याला प्रत्युत्तर देताना अजित पवार म्हणाले, 'उगाच ते काय म्हणतील तर मी बोलणार नाही. मागून समोरून कोणी काही म्हणणार? ते उद्या काहीही म्हणणार आणि तुम्ही आम्हाला विचारणार? असा सवाल अजित पवार यांनी प्रसार माध्यमांना केला.

काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?

"कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा सुरु केल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा जोतिराव फुले यांनीही शाळा सुरु केल्या. यावेळी सरकारने त्यांना अनुदान दिले नाही. तेव्हा त्यांनी लोकांकडे भीक मागितली, शाळा सुरु करायच्या आहेत, पैसे द्या. तेव्हाच्या काळात लोकांनी १० रुपये दिले. आता १० कोटी देणारे लोक आहेत" असं वक्तव्य त्यांनी केलं. पैठणमध्ये एका सभेला संबोधित करताना त्यांनी केलेल्या या वक्तव्याने अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भरधाव कारने पायी जाणा-या महिलेला चिरडले, महिलेचा जागीच मृत्यू

आता केरळ नाही 'केरळम' म्हणायचं! राज्याच्या नामकरणाला केंद्रीय मंत्रिमंडळात मंजुरी

MSRTC: आता खेड्या-पाड्यातही जाणार एसटी; दुर्गम भागातही पोहोचेल लालपरी,परिवहन मंत्र्यांची मोठी घोषणा

How To Drape A Saree: साडी नेसायची सोपी पद्धत, दिसाल तुम्ही सुंदर

Girls Tops Style: जिन्सवर ट्राय करा हे 7 ट्रेंडी लेटेस्ट टॉप्स; ऑफिस किंवा कॉलेजसाठी मिळेल अट्रॅक्टिव्ह लूक

SCROLL FOR NEXT