jayant patil  saam tv
मुंबई/पुणे

संजय राठोडांच्या विरोधात ज्यांनी आंदोलन केले, त्यांनीच मंत्रिमंडळात घेतले; जयंत पाटलांचा हल्लाबोल

शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळाचा विस्तार एक महिन्यानंतर झाला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: एक महिन्यानंतर शिंदे-फडणवीस (Eknath Shinde) मंत्रिमंडळाचा विस्तार आज झाला आहे. आज सकाळी शिंदे गटातील ९ तर भाजमधील ९ आमदारांनी शपथ घेतली. यावर आता विरोधी पक्षांकडून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. ३९ दिवस मंत्रिमंडळ देऊ शकले नाहीत. महाराष्ट्रात सध्या अतिवृष्टी झाली आहे. चाळीस दिवस राज्यातील जनता बेजार झाली होती. राज्यात सरकार माय बाप नाही अशी भावना होती. आता जिल्ह्यात जाऊन शासकीय यंत्रणा कार्यरत करावी, असा टोला माजी मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी लगावला आहे.

कुणाला मंत्रिमंडळात घ्यायचे नाही घ्यायचे हा मुख्यमंत्र्यांचा कौल असतो. त्यांनी आता निर्णय घेतला आहे, जनता आता बघेल. कुणाला संधी दिली कुणाला बाहेर ठेवले यांच्या कहाण्या बाहेर येतील. जे मंत्री आले, त्यांनी चांगले काम करावे, असंही जयंत पाटील म्हणाले.

संजय राठोड यांच्या विरोधात भाजपने आंदोलन केले, पण आता त्यांनीच राठोड यांना सरकारमध्ये घेतले आहे. आम्ही महाविकास आघाडी काळात कुणालाही क्लिनचीट दिली नाही. आम्ही अशी घाई केली नाही, असा टोलाही माजी मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी लगावला.

PM मोदींचे जुने ट्विट पोस्ट करत सुप्रिया सुळेंचा शिंदे-फडणवीसांवर नेम

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला. उशीरा का होईना राज्याला मंत्री मिळाले ही आनंदाची बाब आहे. मंत्रीपदाची शपथ घेतलेल्या सर्वांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा, असं ट्विट खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे, तर या ट्विट मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जुने ट्विट शेअर केले आहे.

'स्वतः पंतप्रधान मा. नरेंद्रीजी मोदी हे देशाच्या प्रगतीसाठी स्त्री-सक्षमीकरण आवश्यक असल्याचे सांगतात. त्यासाठी त्या केवळ 'होम मेकर' असू नयेत तर त्या 'नेशन बिल्डर' असाव्यात असं ते सांगतात. राज्याच्या स्त्री-शक्तीवर हा अन्याय आहे, असं खासदार सुप्रिया सुळे यांनी या ट्विट मध्ये म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti: प्रत्येक महिलेमध्ये असायला हवेत हे 5 गुण; चाणक्यांचे विचार बदलू शकतात आयुष्य

Maharashtra News Live Update: शिरपूरमध्ये सोसाट्याच्या वारासह झालेल्या जोरदार पाऊस

Operation Tiger: मातोश्रीबाहेर शिंदेसेनेची बॅनरबाजी, ६ खासदारांच्या प्रवेशानंतर ठाकरेंना डिवचलं; पाहा VIDEO

ज्यांचं नाव लागेल तेच खरे नशीबवान! घराचं स्वप्न कोणाचं पूर्ण होणार? 13 फ्लॅट्ससाठी 17,755 अर्जदारांचे नशीब पणाला

Tuesday Horoscope : नोकरीच्या समस्या सुटणार, 5 राशींवर होणार धनवर्षाव; वाचा मंगळवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT