ajit pawar and chandrakant patil  Saam tv
मुंबई/पुणे

Ajit Pawar: कोणी बोलावत नसेल म्हणून आदेश काढला असेल, चंद्रकांत पाटलांच्या 'त्या' आदेशावर अजित पवारांची टोलेबाजी

पर्वती विधानसभामध्ये माजी नगरसेवक सुभाष जगताप यांच्या कार्यलयाचे उद्घाटन अजित पवारांनी केले.

साम टिव्ही ब्युरो

पुणे : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर त्यांनी काढलेल्या एका आदेशावरुन टीकास्त्र सोडलं आहे. चंद्रकांत पाटील यांनी काढले आहे की माझ्याशिवाय कार्यक्रम करू नका, पण कोणी बोलावत नसेल म्हणून हे आदेश काढले असले पाहिजेत, असा टोला अजित पवार यांनी लगावला.

पुण्यात अजित पवार यांच्या हस्ते जनसंपर्क कार्यलयाचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. पर्वती विधानसभामध्ये माजी नगरसेवक सुभाष जगताप यांच्या कार्यलयाचे उद्घाटन अजित पवारांनी केले.

चंद्रकांत पाटलांनी आदेशात म्हटलं की, शासकीय कार्यक्रमाचं पूर्व परवानगीनं आयोजन करावं.विकासाच्या कामाला कशाला परवानगी हवी. निधी काय पालकमंत्र्याच्या घरातला आहे का? यांना कोणी बोलवतच नाही म्हणून हे आदेश ऑर्डर काढले असावेत. अरे पालकमंत्र्यात पण धमक पाहिजे, असं अजित पवारांनी म्हटलं. (Latest Marathi News)

तोडतोडीचं राजकारण करून स्थिरता राहत नाही. आता सरकार कसं आलं तुम्हला माहिती आहे. स्थिरता असेल तर अधिकारी काम करतात पण आता बघा काय चालले आहे. आता उद्योग गेले,नोकऱ्या गेल्या,उद्योग गेल्याच दुःख लोकांना आहे पण राजकारण्यांना नाही, असंही अजित पवारांनी म्हटलं.

योगी महाराज आले आहेत. ते तिकडून येऊन आपल्या उद्योगवर डल्ला मारत आहेत आणि आपले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री काय करत आहेत. सगळ्यात जास्त बेरोजगारी आपल्या महाराष्ट्रात आहे. मंत्रिमंडळ विस्तार अजून नाही. आधी दोनच टीकोजीराव सरकार चालवत होते. परत मंत्रिमंडळ विस्तार केला तर एका एकाला सहा-सहा मंत्रालय दिले. सावित्रीबाई फुले जिजाऊच्या महाराष्ट्रात एकही महिला मंत्री मंत्रिमंडळात नाही. अशी टीकाही अजित पवारांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shivbhojan Thali: उद्धव ठाकरेंची 'शिवभोजन थाळी' योजना बंद पडणार? गैरव्यवहाराच्या तक्रारींमुळे केंद्र बंद करण्याचे आदेश|VIDEO

Rajgad To Pratapgad: राजगड ते प्रतापगड प्रवास कसा कराल? बस, रेल्वे आणि खासगी वाहन मार्ग

Kalyan News: मराठी तरुणीला मारहाण प्रकरण, आरोपीच्या भावाचा तुरुंगातील मुक्काम वाढला; कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला

Pune News : नवीकोरी स्कूटर महिन्यात खराब, पट्ट्याने शोरूमला नेली अन् पेटवून दिली, पुण्यातील घटना

Beed News: वाल्मिक कराडकडे सापडला स्पेशल फोन, भाजप आमदाराच्या दाव्याने खळबळ; बीड पोलिस संशयच्या भोवऱ्यात|VIDEO

SCROLL FOR NEXT