Ajit Pawar, Rohit Pawar
Ajit Pawar, Rohit Pawar Saam Tv
मुंबई/पुणे

आमदार रोहित पवारांच्या 'त्या' वक्तव्यावर अजित पवारांनी स्पष्टच सांगितले

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: '२०२४ नंतरचा काळ हा युवकांचा आमचाच असणार आहे. युवकांचे दिवस आले की निर्णय सुद्धा आपण घेणार आहे. यामध्ये शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांचे मार्गदर्शन असेलच. पण निर्णय मात्र नवीन पिढीचे राहणार आहे', असं मोठं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमदार रोहित पवार(Rohit Pawar) यांनी काही दिवसांपूर्वी केले होते, यावर आज विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

रोहित पवार यांच्या वक्तव्यावर बोलताना अजित पवार म्हणाले, मार्गदर्शन करत असताना आम्ही नेहमीच तरुणांना संधी दिली आहे. २०२४ ला आम्ही तरुणांना नेतृत्व देणार आहे. मी आणि शरद पवार साहेब मार्गदर्शन करणार आहे. २९१४ मध्ये काही अमुभवी आणि काही नव्या चेहऱ्यांना आम्ही संधी देणार आहे, असंही अजित पवार म्हणाले.

'२०२४ नंतरचा काळ आमचाच'

'२०२४ नंतरचा काळ हा युवकांचा आमचाच असणार आहे. युवकांचे दिवस आले की निर्णय सुद्धा आपण घेणार आहे. यामध्ये शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांचे मार्गदर्शन असेलच. पण निर्णय मात्र नवीन पिढीचे राहणार आहे', असं मोठं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमदार रोहित पवार(Rohit Pawar) यांनी केलं आहे. (Rohit Pawar News In Marathi)

रोहित पवार आज, शनिवारी जुन्नर दौऱ्यावर होते. त्यावेळी जुन्नर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहीर मेळाव्यात बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यातील सत्तेच्या राजकारणाची गणितं जुन्या नाही तर तरुणांच्या हाती येणार असल्याचे संकेतच भर सभेत रोहित पवारांनी दिले आहे.

रोहित पवार म्हणाले, 'आम्ही जमिनीवर सोडून कधीच वागणार नाही. लोकांमध्ये जमिनीवर राहण्याची आणि मागच्या पिढीची शिकवण स्वीकारून ती आत्मसात केली आहे. २०२४ पर्यंत याच शिकवणीतून आम्ही चालणार आहे. मात्र, २०२४ नंतरचा काळ हा युवकांचा आमचाच आहे. युवकांचे दिवस आले की निर्णय सुद्धा आपण घेणार आहे. यामध्ये शरद पवार आणि अजित पवार यांचे मार्गदर्शन असेलच, निर्णय मात्र नवीन पिढीचे राहणार आहे'.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hardik Pandya Troll: हार्दिकने रोहितलाच केलं प्लेइंग ११ मधून बाहेर! फॅन्सच्या संतप्त प्रतिक्रिया

Mega Block : रविवारी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक; कोणत्या मार्गावरील सेवा असणार बंद? कोणत्या मार्गावर विशेष सेवा?

Kolhapur News: 'साम टीव्ही'चा लोगो वापरून प्रेक्षकांची दिशाभूल करणारा व्हिडिओ केला व्हायरल, अज्ञात व्यक्ती विरोधात तक्रार दाखल

Today's Marathi News Live : संभाजीनगर शहरात गॅस सिलिंडरचा स्फोटानंतर लागली आग

Special Report : कोकणात रंगणार ठाकरे विरूद्ध ठाकरे लढाई, सभांचा झंझावात

SCROLL FOR NEXT