Jayant Patil  saam tv
मुंबई/पुणे

Jayant Patil on may Join BJP : भाजपसोबत जाण्याच्या चर्चांवर जयंत पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Political news : मी अमित शाहांना कधी भेटलो याचं संशोधन करा, असंही जयंत पाटील यांनी म्हटलं.

साम टिव्ही ब्युरो

Mumbai News : राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि शरद पवार यांचे निकटवर्तीय जयंत पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची गुप्तभेट घेतल्याची माहिती समोर आली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने ही भेट झाल्याची चर्चा होती. या चर्चांवर आता जयंत पाटील यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

मी  मंत्री अमित शाह कधी भेटलो याचं संशोधन करा. चर्चा कोण करतंय त्यांच्याकडे चौकशी करा. मी कालही इथेच होतो आणि आजही इथेच आहे. मी पुण्याला कधी गेलो तुम्हीच सांगा, असंही जयंत पाटील यांनी म्हटलं.

मी कालही पवार साहेबांना भेटलो काल रात्री मी माझ्या पक्षातले वरिष्ठ आमदार आहेत त्यांच्याशी देखील चर्चा केली. आज सकाळी देखील मी पवार साहेबांना भेटलो, अशा माहिती जयंत पाटील यांनी दिली.

आपण ज्या बातम्या चालवल्या आहेत की मी दिल्लीत भेटलो किंवा अन्य कुठे भेटलो यात कुठलीही स्पष्टता नाही. ज्या बातम्या येत आहे त्यातून माझी करमणूक होत आहे. माझ्याबद्दल गैरसमज यातून पसरत आहे. माझ्यावर कुणाचाही दबाव नाही. (Political News)

मी शरद पवार साहेबांशी रोज भेट घेत आहे. कुठे गेलोच तर तुम्हाला सांगेन, असंही जयंत पाटील यांनी म्हटलं. माझी आपल्या सर्वांना विनंती आहे, अशा बातम्या चालवताना खात्री बाळगूनच त्या चालवायला हव्यात, असंही जयंत पाटील म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Mali: बोल्ड, बिनधास्त अन् ब्युटिफुट प्राजक्ता माळी; PHOTO पाहा

Maharashtra Live News Update: बच्चू कडू यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ जालन्यात शेतकऱ्यांचा रास्ता रोको..

Kidney Health: हे ३ ज्यूस किडनी डॅमेजचा धोका करतात, शरीरातील घाण अन् युरिक अॅसिडही होईल साफ

Shahapur News : गॅस्ट्रोलचा प्रादुर्भाव वाढला! ४ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू, अनेक रुग्णांची प्रकृती गंभीर

Kobi Benifits : कोबी खाण्याचे जबरदस्त फायदे तुम्हाला माहिती आहेत का? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT