Mahesh Tapase  Saam Tv
मुंबई/पुणे

Mahesh Tapase: नगराध्यक्ष-उपनगराध्यक्ष निवडणुकीत राष्ट्रवादीचा 1 No., भाजपला दुसरा नंबरही गाठता आला नाही - महेश तपासे

भाजपला दुसरा क्रमांकही गाठता आला नाही असं म्हणत त्यांनी भाजपला चिमटे काढले आहेत.

रामनाथ दवणे, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: नुकत्याच झालेल्या नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पहिल्या नंबरचा पक्ष ठरला, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी दिलीये. तर भाजपला दुसरा क्रमांकही गाठता आला नाही असं म्हणत त्यांनी भाजपला चिमटे काढले आहेत (NCP is the number one party in the mayor and deputy mayor elections says Mahesh Tapase).

राज्यात एक नंबरचा पक्ष ठरला अशा बाता मारणाऱ्या भाजप (BJP) ला या निवडणुकीत दुसरा नंबरही गाठता आलेला नाही, असा खोचक टोलाही महेश तपासे (Mahesh Tapase) यांनी भाजपला लगावला आहे. नगरपंचायत निवडणुकीत विरोधकांनी राष्ट्रवादी (NCP) ला बदनाम करण्याची अनेक षड्यंत्र रचली. तरी देखील महाराष्ट्रातील जनतेने नगरपंचायतीत राष्ट्रवादीला कौल दिला आहे, असेही ते म्हणाले.

राष्ट्रवादी : काँग्रेस नगराध्यक्ष - 30 , उपनगराध्यक्ष - 30

शिवसेना : नगराध्यक्ष - 27 , उपनगराध्यक्ष - 16

कॉंग्रेस : नगराध्यक्ष - 20, उपनगराध्यक्ष - 21

भाजप : नगराध्यक्ष - 20, उपनगराध्यक्ष - 21

याचा अर्थ एक नंबरचा पक्ष दुसर्‍या नंबर गाठू शकला नाही, असेही महेश तपासे म्हणाले.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

HBD Parineeti Chopra : राघव चड्ढाची 'परी' किती कोटींची मालकीण? आकडा वाचून डोळे फिरतील

Jio Recharge Offer: जिओचा नवीन पोस्टपेड प्लॅन धमाका! फक्त 'या' किमतीत ७५ जीबी डेटासह मिळवा प्रीमियम सुविधा

Maharashtra Live News Update: पुण्यात दिवाळी पाडव्याची धूम, सारसबागमध्ये तरुणाईंची गर्दी

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, ऑक्टोबरचा हफ्ता पुढच्या आठवड्यात मिळणार; ई-केवायसीला लावला ब्रेक

Malavya Rajyog: नोव्हेंबरमध्ये शुक्र ग्रह बनवणार मालव्य महापुरुष राजयोग, 'या' राशींचा सुरु होणार गोल्डन टाईम

SCROLL FOR NEXT