Sharad Pawar Saam TV
मुंबई/पुणे

शरद पवारांना धमकीचं ट्विट; राष्ट्रवादीकडून सायबर सेलमध्ये तक्रार

राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरज चव्हाण यांनी ही तक्रार दाखल केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना एका ट्विटर हँडलवरुन धमकीची पोस्ट शेअर केली आहे. धमकीच्या या ट्विट प्रकरणी राष्ट्रवादी युवकने सायबर सेलमध्ये तक्रार दाखल केली आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सुरज चव्हाण यांनी ही तक्रार दाखल केली आहे. या ट्विटर हँडलचा शोध घेवून कारवाई करण्याची मागणी या तक्रारीत करण्यात आली आहे. या प्रकरणी मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनीही ट्विट केले आहे.

'बागलाणकर' अस या ट्विटर हँडलचे नाव आहे. या ट्विटर हँडलवरुन शरद पवार यांना धमकी देण्यात आली आहे. काल खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांचा महाराष्ट्र भाजपच्या ट्विटर हँडलवरुन एक व्हिडिओ ट्विट करुन शरद पवार यांच्यावर आरोप करण्यात आला होता. हा व्हिडिओ साताऱ्यातील एका कार्यक्रमामधील होता. यात पवार यांनी एक कविची कविता वाचून दाखवली होती. यातील काही भाग शेअर करण्यात आला होता.

या व्हिडिओ वरुनच भाजपने (BJP) पवार यांच्यावर आरोप केले होता. या व्हिडिओवरुनच पवार यांना ट्विटरवरुन धमकी दिली आहे. यावरुन आता राष्ट्रवादीने सायबर सेलला तक्रार दाखल केली आहे. तसेच पवार यांच्या भाषणातील विधान चुकीच्या पध्दतीने शेअर करुन शरद पवार यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. याप्रकरणी भाजपच्या ट्विटर हँडलवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

काय आहे कविता?

तुमचा दगड धोंडा आमही आमच्या छन्नी आणि हातोड्याने फोडतो. त्यातून तुमच्या घरात अन्न तयार करायला. पिठ तयार करायला जे लागतं ते आम्ही घडवतो. ज्या जात्यातून पिठ निघतं त्याने तुमचं पोट भरतं. आज आम्ही अनेक गोष्टी घडवल्या. आमच्या छनीने, हातोड्याने आणि घामाने, तुम्ही ज्यांची पूजा करता त्या ब्रह्मा, विष्णू महेश यांच्या मूती आम्ही घडवल्या. तुम्ही त्या मंदिरात ठेवल्या आणि साल्यांनो, तुम्ही आम्हाला त्या मंदिरात येऊ देत नाही. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की, ब्रह्मा, विष्णू आणि महेश आम्ही आमच्या हाताने घडवला. हा तुमचा देव, तुमच्या देवाचे बाप आम्ही आहोत. त्यामुळे आमच्यावरील अन्याय सहन करणार नाही असं काव्य जवाहरनं लिहून ठेवल्याचं शरद पवारांनी (Sharad Pawar) सांगितले.

जितेंद्र आव्हाड यांनीही कारवाईची केली मागणी

शरद पवार (Sharad Pawar) यांच्या धमकीच्या ट्विट प्रकरणी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कारवाईची मागणी केली आहे. या मागणीचे त्यांनी ट्विट केले आहे. 'काय पातळी वर हे सगळे होतं आहे. या विकृत इसमा विरुद्ध कडक कारवाई करा', असं ट्विट आव्हाड यांनी केलं आहे.

Edited By- Santosh Kanmuse

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

SCROLL FOR NEXT