Sharad Pawar Saam TV
मुंबई/पुणे

Sharad Pawar : चंद्रकांत पाटलांची त्यांच्या जिल्ह्यात निवडून यायची क्षमता नाही; शरद पवार यांचा थेट निशाणा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यात जोरदार कलगीतुरा पाहायला मिळत आहे.

Dnyaneshwar Choutmal

Sharad Pawar News : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यात जोरदार कलगीतुरा पाहायला मिळत आहे. चंद्रकांत पाटील हे शरद पवार यांच्यावर टीका करण्याची संधी सोडत नाहीये. दुसरीकडे शरद पवार देखील चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करताना दिसत आहे. आजही पुण्यात शरद पवार यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला. (Latest Marathi News)

महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे याचा शरद पवार यांनी सत्कार केला. महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे याची खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासोबत मोदीबागेत भेट झाली. त्यानंतर शरद पवार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

शरद पवार म्हणाले, 'चंद्रकांत पाटील यांचं कोथरूडमध्ये योगदान काय होतं? जो माणूस आपल्या जिल्ह्यात निवडून आला नाही, त्यांना काय बोलायचं. चंद्रकांत पाटील शक्तिमान माणूस, असा टोला शरद पवारांनी लगावला.

शरद पवार पुढे म्हणाले, 'चंद्रकांत पाटील हे फार शक्तिमान गृहस्थ आहे. त्यांचे घर कोल्हापूरला आणि ते निवडणूक कोथरूडमधून लढले. त्यांना त्यांचं गाव सोडून कोथरूडमध्ये यावं लागलं. त्यांचं कोथरूड मध्ये काय योगदान? त्यांच्यावर काय भाष्य करावं?, असा जोरदार घणाघात शरद पवार यांनी चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर केला.

नाशिक पधवीधर निवडणुकीतील राजकारणावर शरद पवार म्हणाले, 'माझी कुणाशी चर्चा झाली नाही. हे चित्र जे दिसतं आहे, काळजी करण्यासारखे आहे. मला जागेबाबत माझ्या पक्षाने कळवलं होतं. आम्ही एकमेकांना सहकार्य करण्याचं ठरवलं होतं. नागपूरमध्ये आम्ही सेनेला पाठिंबा देऊ. नाशिक बाबतीत मला अधिक माहिती नाही'.

'काँगेसने ज्याला तिकीट दिलं होते, त्यांनी काम देखील केलं आहे. त्या ठिकाणी तरुण कार्यकर्त्याला संधी दिली. तांबे हे काही पक्षाच्या बाहेरचे नाहीत. बसून वाद मिटवता आला असता, अजून देखील वाद मिटवता येऊ शकतो. जे घडलं ते नाकारता येणारं नाही. थोरात पक्षाचे मोठे नेते आहे, असे पवार पुढे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शिवसेनेवर अंतिम शिक्कामोर्तब? शिंदे-ठाकरे वादावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु

मराठवाड्यात 3 जणांचं कुणबी प्रमाणपत्र अवैध; मनोज जरांगे फडणवीस सरकारवर संतापले|VIDEO

Kalyan : सख्ख्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या बापाला थेट जन्मठेपेची शिक्षा, कल्याण कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

Supreme Court: CJP वर कारवाई करा; याचिकेवर सुप्रीम कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी, वाचा नेमकं प्रकरण काय?

गॅस भरलेले फुगे हवेत उडल्यानंतर कुठे जातात?

SCROLL FOR NEXT