Pune NCP विश्वभूषण लिमये
मुंबई/पुणे

Pune: राष्ट्रवादीची केंद्र सरकार विरोधी अनोखी होळी, दहन केली महागाई आणि बेरोजगारी (पहा Video)

आज देशभरात होळीचा (Holi) सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात असताना, पुण्यामध्ये मात्र राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) अनोख्या पद्धतीची होळी साजरी करण्यात आली आहे.

विश्वभूषण लिमये

पुणे : आज देशभरात होळीचा (Holi) सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात असताना, पुण्यामध्ये मात्र राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) अनोख्या पद्धतीची होळी साजरी करण्यात आली आहे. राष्ट्रवादीने ही होळी केंद्र सरकार (Central Government) विरोधात केली असून यावेळी गोवऱ्या रचून त्यावरती पेट्रोल दरवाढ, महागाई, बेरोजगारी, सरकारी कंपण्यांचे खासगीकरण, सीबीआय, इडी (CBI,ED) अशा नावांचे फलक लावण्यात आलेले.

पहा व्हिडीओ -

तसंच 'सत्तेचा दुरुपयोग करुन विरोधकांवर सुड घेणाऱ्या आसुरी शक्तीची होळी' असे बॅनर देखील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून लावण्यात आले होते. तर केंद्र सरकारच्या विरोधात बोंम्ब देखील मारण्यात आली, यावेळी पुणे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगतापांसह (Prashant Jagtap) अनेक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News : देवीच्या दर्शनाला जाताना काळाचा घाला! विरारमध्ये टँकरच्या धडकेत माय लेकीचा मृत्यू

DA Hike: खुशखबर! केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार बंपर वाढ; DA मध्ये थेट 'इतक्या' टक्क्यांची वाढ होणार

Mobile Charger: मोबाईलचा चार्जर खराब होण्याआधी कोणती 5 लक्षणं दिसतात?

Maharashtra News Live Update: रत्नागिरी शहरात आजपासून पाणी कपात लागू

Congress Protest Live Update : दिल्लीत हायव्होल्टेज ड्रामा! दुपारी दीड वाजता इंडिया आघाडी रस्त्यावर, सुप्रीम कोर्टावर महामोर्चा

SCROLL FOR NEXT