mayor shubhangi pote, ncp , bjp, congress saam tv
मुंबई/पुणे

Political News : एनसीपी, भाजप एकवटली; काँग्रेस नगराध्यक्षांवर अविश्वास ठराव दाखल

मनमानी कारभाराचा आराेप.

सचिन आगरवाल

श्रीगोंदा पालिकेच्या लाेकनियुक्त नगराध्यक्षा शुभांगी पोटे (mayor shubhangi pote) या मनमानी कारभार करीत असल्याचा आराेप करीत एकूण 16 नगरसेवकांनी (राष्ट्रवादी, भाजपसह) यांच्यावर अविश्वास ठराव दाखल केला आहे. या पालिकेत एकूण 19 नगरसेवक आहेत. त्यापैकी 16 जणांना हा ठराव आणला आहे. त्यामुळे पाेटे या अडचणीत आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. (shrigonda latest marathi news)

जनतेतून निवडून आलेल्या श्रीगोंदा नगरपरिषदेच्या काँग्रेसच्या (congress) नगराध्यक्षा शुभांगी पोटे यांच्यावर 16 नगरसेवकांनी अविश्वास ठराव आणला आहे. लोकनियुक्त नगराध्यक्ष यांच्यावर असा अविश्वास ठराव करण्याची महाराष्ट्रातील (maharashtra) ही पहिलीच घटना असावी अशी चर्चा आहे.

सन 2019 मध्ये तत्कालीन नगराध्यक्ष शुभांगी पोटे या काँग्रेसच्या तिकीटावर जनतेतुन निवडून आल्या होत्या. त्यांचे पती मनोहर पोटे हे नगरसेवक झाले होते. मागील काही दिवसात गटनेते असलेले मनोहर पोटे हे मनमानी कारभार करत असल्याचा आरोप ज्योती सुधीर खेडकर (उपनगराध्यक्ष) तसेच गणेश भोसले (गटनेते) यांच्यासह इतर नगरसेवकांनी केला आहे. (Maharashtra News)

दरम्यान पाेटे यांच्या विराेधातील नगरविकास विभागाकडे एका जून्या तक्रारीवरुन मंत्रालयात (mantralay) येत्या सात नोव्हेंबरला दुपारी मुख्यमंत्री यांच्या समिती कक्ष येथे सुनावणी हाेणार आहे. त्यामुळे तिथेही नगराध्यक्ष शुभांगी पोटे आणि नगरसेवक मनोहर पोटे यांची कसोटी लागणार आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. (Breaking Marathi News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nagpur : पिकांच्या संरक्षणासाठी तारेत सोडला विद्युत प्रवाह; चारा कापताना झाला घात, विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू

Aamhi Saare Khavayye : खुशखबर! मराठी कुकिंग शो 'आम्ही सारे खवय्ये' येतोय? पाहा VIDEO

Rave Party: रेव्ह पार्टी म्हणजे नेमकं काय?

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

Masala Gobi Recipe : कोबीच्या भाजीला द्या खास ट्विस्ट, मुलं ५ मिनिटांत फस्त करतील टिफिन

SCROLL FOR NEXT