rupali thombare news  Saam tv
मुंबई/पुणे

नाराज रुपाली ठोंबरेंची अजित पवार गटाकडून मनधरणी; राजीनाम्याच्या चर्चेनंतर महत्वाची जबाबदारी

rupali thombare news : अजित पवार गटाकडून नाराज रुपाली ठोंबरेंची मनधरणी करण्यात आली आहे. राजीनाम्याच्या चर्चेनंतर त्यांना महत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.

Akshay Badve

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहराची कार्यकारिणी जाहीर

अजित पवार गटाच्या नव्या कार्यकारिणीत नाराज रुपाली ठोंबरे पाटील यांना स्थान

पक्षाकडून ठोंबरेंची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न

पुणे : अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहराची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. या नव्या कार्यकारिणीत नाराज रुपाली ठोंबरे पाटील यांना स्थान देण्यात आलं आहे. त्यांना एका मतदारसंघाचं कार्याध्यक्षपद देण्यात आलंय. राजीनाम्याच्या चर्चेनंतर ठोंबरेंना महत्वाची जबाबदारी देऊन पक्षाने नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केल्याचं दिसत आहे.

रुपाली ठोंबरे आणि रुपाली चाकणकर यांच्यातील वादामुळे अजित पवार गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला होता. दोघांमधील वाद पक्षश्रेष्ठीपर्यंत पोहोचला होता. या वादानंतर रुपाली पाटील ठोंबरे यांची पक्षाच्या प्रवक्तेपदावरून गच्छंती झाल्याचं बोललं गेलं. त्यामुळे रुपाली पाटील यांनी नाराजीही व्यक्त केली होती. काही दिवसांपूर्वी ठोंबरे यांनी शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर ठोंबरे यांच्या राजीनाम्याची जोरदार चर्चा सुरु होती.

राजीनाम्याच्या चर्चेदरम्यान अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे यांच्याकडून रुपाली ठोंबरे पाटील यांना महत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. अजित पवार गटाने सर्व विधानसभेत अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि समन्वयक नेमले आहेत. त्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाच्या कार्यध्यक्ष पदावर रुपाली पाटील यांची नेमणूक करण्यात आली आहे. पक्षाने नवी जबाबदारी दिल्याने त्यांची नाराजी दूर होतेय का, हे पाहावे लागणार आहे.

आमदार टिंगरे यांनी पत्रात काय म्हटलं?

सुनील टिंगरे यांनी पत्रात म्हटलं आहे की, 'अजित पवार यांनी मला पुणे शहर अध्यक्ष (पूर्व) या पदावर नियुक्ती दिली. तसेच माझ्याकडे वडगावशेरी, हडपसर, शिवाजीनगर व कसबा विधानसभा मतदारसंघाचे कार्यक्षेत्र दिलंय'

'पक्षाध्यक्ष्यांच्या आदेशानुसार माझ्या कार्यक्षेत्रातील पुणे शहर कार्यकारीणी तयार केलेली आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शिव, शाहू, फुले आंबेडकरांच्या विचारांच्या व पुरोगामी विचारांच्या सक्रीय कार्यकर्त्यांचा समावेश केलाय. या कार्यकारीणीचा तपशील देत आहे, असेही त्यांनी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबई पुणे महामार्गावर सुट्ट्यांमध्ये वाहतूक कोंडी..

Gmail Update: आता Gmail ID बदलता येणार! Google आणतोय भन्नाट फीचर, मेलचं झंझट होईल कमी

PNB Fraud: बँकिंग क्षेत्राला हादरवणारी बातमी! पंजाब नॅशनल बँकेत २४३४ कोटींचा घोटाळा

Pune : शिक्षिकेला 'I Love You' चा मेसेज पाठवला, ब्लेडने हातावर नाव कोरलं, पुण्यातील विद्यार्थिनीचा धक्कादायक प्रकार

Maharashtra Tourism : नवीन वर्षात फॅमिलीसोबत ट्रेक प्लान करताय? 'हा' आहे महाराष्ट्रातील साधा-सोपा किल्ला

SCROLL FOR NEXT