NCB धडक कारवाई, 4 कोटींचे अमली पदार्थ जप्त  Saam Tv
मुंबई/पुणे

NCB धडक कारवाई, 4 कोटींचे अमली पदार्थ जप्त

या कारवाईत एनसीबीने एकाला अटक केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - एनसीबीने दोन दिवसात पुन्हा एकदा दुसरी धडक कारवाई केली आहे. मुंबई झोनल युनिटने ही छापेमारी करत 4 कोटींचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. मुंबई विमानतळ परिसरात ही कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईत एनसीबीने एकाला अटक केली आहे.एनसीबीला सहार इंटरनॅशनल कुरिअर टर्मिनलवर पार्सलद्वारे अंमली पदार्थ येणार असल्याची माहिती मिळाली होती.

हे देखील पहा -

या माहितीच्या आधारे एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकत ही कारवाई केली आहे. यावेळी तपासणी दरम्यान एनसीबीला एका पार्सलमध्ये संशयित पावडर आढळून आली. त्यानंतर या पावडरची तपासणी केली असता ती पावडर हेरॉईन असल्याचे स्पष्ट झाले. याची किंमत अंदाजित चार कोटी रुपये आहे.

एनडीपीएस कायद्यांतर्गत एनसीबीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडोदरामधील एका व्यक्तीचे हे पार्सल असल्याची माहिती समोर आली आहे. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी या व्यक्तीची चौकशी केल्यानंतर त्याला अटक केली आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pradeep Purnekar : ठाण्यात राजकीय वादातून ५ राऊंड फायर अन्.. आरोपी पप्प्याला बेड्या, प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट

Maharashtra News Live Update: भारताच्या लोकशाहीवर भाजपने हल्ला केलाय- राहुल गांधी

Best Time to Eat Bananas: सकाळी की रात्री? केळी खाण्याची योग्य वेळ कोणती?

Cow Ghee vs Buffalo Ghee : गाईचं की म्हशीचं? आरोग्यासाठी नेमकं कोणतं तूप चांगलं? जाणून घ्या

Housing Society : सोसायटीचा मेंटेनन्स भरला नाही म्हणून पाणी बंद केलं? जाणून घ्या फ्लॅट मालकाचा अधिकार, कायदा काय सांगतो?

SCROLL FOR NEXT